शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सातपुड्याची स्ट्राॅबेरी निघाली उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील स्ट्रॉबेरी आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षाही चांगल्या प्रतिची उत्पादीत होत असल्याने जिल्हाधिकारी बुधवारी नाशिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील स्ट्रॉबेरी आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षाही चांगल्या प्रतिची उत्पादीत होत असल्याने जिल्हाधिकारी बुधवारी नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या स्ट्राॅबेरीची भेट देणार आहे. या भेटी बराेबरच स्ट्रॉबेरीला न्याय मिळावा म्हणून तोरणमाळ पर्यटन विकासाच्या ५० कोटींचा प्रस्तावही ते सादर करणार आहेत.बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची विकासासंदर्भातील बैठक होणार आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे देखील या बैठकीला जात असून, सातपुड्यातील पर्यटन विकासाला न्याय मिळावा यासाठी ते उपमुख्यमंत्र्याना स्ट्रॉबेरी भेट देणार आहे. या स्ट्राॅबेरीचे उत्पादन नुकतेच सुरू झाले असून, त्याची चव ही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा वरचढ ठरली आहे. तोरणमाळसह डाब व इतर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. या स्ट्रॉबेरीला बाजारपेठेसाठी सुविधा व्हावी व शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या मागणीबरोबरच तोरणमाळ विकासाचा सुमारे ५० कोटी रूपयांचा आराखडा ते सादर करणार आहेत. तोरणमाळ हे पर्यटन विकासाच्या यादीत ब दर्जा देण्यात आला असून, त्यानुसार त्याचा विकास करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लाेकमत’शी बोलताना दिली.