शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

नंदुरबार : उधना-जळगाव मार्गाने धावणाऱ्या कोरोना स्पेशल रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. या गाड्यांचे तिकीट दर सामान्य प्रवासी गाड्यांपेक्षा ...

नंदुरबार : उधना-जळगाव मार्गाने धावणाऱ्या कोरोना स्पेशल रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. या गाड्यांचे तिकीट दर सामान्य प्रवासी गाड्यांपेक्षा वाढीव असल्याने, तसेच त्यात जनरल डबेही आरक्षित असल्याने हाल होत आहेत. दरम्यान, रेल्वेकडून या गाड्या कोरोना संपल्यानंतर बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनवेळा झालेल्या लाॅकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेगाड्यांना मोठा फटका बसला होता. यातून काही काळासाठी रेल्वे वाहतूक बंदही करण्यात आली होती. सध्या रेल्वे सुरळीत सुरू असली तरी प्रवाशांना मात्र स्पेशल रेल्वेत जागा मिळवणे कठीण झाले आहे. विशेष बाब म्हणजे ऐनवेळी आरक्षण केलेल्या रेल्वेही रद्द करण्याचे प्रकार सुरू असल्याने समस्या निर्माण होत आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या गाड्यांतून कोरोनाला अटकाव करण्यात येत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. येत्या काळात देशातून कोरोना हद्दपार झाल्यानंतरच या गाड्या बंद होतील, असे रेल्वेने म्हटले आहे.

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

रेल्वेकडून सुरू असलेल्या स्पेशल रेल्वेगाड्यांचे भाडे सर्वसामान्य गाड्यांपेक्षा दुप्पट असते.

१०० टक्के आरक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये जागा मिळवणे छोट्या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना कठीण होत आहे.

जनरल डबे कधी अनलाॅक होणार

कोरोनामुळे जनरल डब्यात गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. यातून जनरल डब्यात आरक्षण करणे सक्तीचे होत आहे.

पॅसेंजर गाडीतही आरक्षण करण्याची सक्ती केली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने नियमित रेल्वेचा प्रवास होत होता; परंतु आता गाड्या कमी झाल्या आहेत. आरक्षण मिळत नाही. स्पेशल गाड्यांमध्ये सतत वेटिंग येत असल्याने अडचणी येतात.

-आदित्य वळवी, नंदुरबार,

गुजरातमध्ये सततचे येणे-जाणे आहे. व्यवसायासाठी लागणारा माल आणावा लागतो. ऑनलाईन व्यवहार होत असले तरीही कामानिमित्त जावेच लागते. अशावेळी रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळत नाही.

-योगेश चाैधरी, नंदुरबार.