शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बर्डीपाडा येथे 13 वर्षानंतर शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहादा तालुक्यातील शेल्टीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर       ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहादा तालुक्यातील शेल्टीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर            2006 मध्ये आलेल्या महापुराने पुनर्वसन झालेल्या बर्डीपाडा वसाहतीत 13 वर्षानंतर नवीन शाळा सुरू करून शिक्षणाचा मुहूर्त करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात शिरूडचे केंद्रप्रमुख  एस.एन. चौधरी हे शेल्टी शाळेला भेट देऊन वर्ढेटेंभे येथे जात असताना त्यांना डोंगराच्या पायथ्याशी वस्ती दिसली. तेथे जाऊन त्यांनी चौकशी केली असता बरीच मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यानंतर त्यांनी विस्तार अधिकारी उषा  पेंढारकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. चौधरी व पेंढारकर यांनी बर्डीपाडा येथे जाऊन गावातील मुलांचा सव्रे केला. तेव्हा येथे 40 मुले आढळून आली. त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत या सर्व मुलांना दीड किलोमीटर अंतरावरील ससदे टेकडी येथील शाळेत दाखल केले. मात्र लहान मुलांना डोंगर ओलांडून शाळेत जाणे कसरतीचे          ठरत होते. त्यामुळे उषा पेंढारकर व चौधरी यांनी गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील यांच्याशी बर्डीपाडा येथेच शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली. पाटील यांनी शाळा सुरू करण्याबाबत परवानगी दिल्याने त्यांच्याच हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी उषा पेंढारकर, केंद्रप्रमुख एस.एन. चौधरी, सुनील ठाकरे, माजी सरपंच दाज्यू मोरे, ग्रामस्थ व शिरूड, शेल्टी, वर्ढेटेंभे, ससदे टेकडी, पळसवाडा येथील शाळांचे शिक्षक उपस्थित होते. या नवीन शाळेवर शेल्टी येथील शिक्षक सुनील गवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी गटशिक्षणाधिकारी पाटील व पेंढारकर यांनी पालकांना मुलांना नियमित शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन मोहन शिंपी यांनी केले.