शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी नोटीसा दिलेल्या ९ जणांची चाैकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात १४ वा वित्त आयोग आणि पाच टक्के पैसा निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात १४ वा वित्त आयोग आणि पाच टक्के पैसा निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी चाैकशीसाठी नोटीसा बजावण्यात आलेल्या आजी-माजी सरपंच, उपसरपंच, प्रशासक, ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. परंतू  दिवसभराच्या चाैकशी योग्य तो हिशोब मिळाला नाही. परिणामी त्यांची गुरुवारी पुन्हा चाैकशी होणार आहे.  जिल्हा परिषदेने नोटीसा बजावल्यानुसार सर्व ९ जण सकाळी ११ वाजेपासून आले होते. त्यांची चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन विस्तार अधिकारी नियुक्त केले होते. दरम्यान पदाधिकारी व शासकीय सेवकांनी आणलेल्या हिशोबाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात दिवसभर आकड्यांचा खेळ सुरु राहिल्याने निष्कर्ष निघू शकला नाही परिणामी माजी सरपंच  अमरसिंग हुपा वळवी,  प्रशासक आर. एम. देव,  प्रशासक जे. एस. बोराळे, माजी सरपंच उषाबाई बोरा, माजी उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, विद्यमान सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी,  ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, आनंदा पाडवी व ग्रामसेवक एस. आर. कोळी यांना गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून पुन्हा जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून बुधवारी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व ९ जणांनी केवळ त्यांचे लेखी जबाब आणल्याची माहिती आहे. अक्कलकुवा ग्रामंपचातयींच्या दप्तरात मोठ्या प्रमाणात तफावती असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभर सर्वांची समोरासमोर चाैकशी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम निष्कर्ष समोर येण्यास मात्र उशिर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचा निकाल तातडीने लागणे शक्यच नसल्याचा दावा प्रशासकीय वर्तुळातून केला जात आहे. 

उपमुख्यमंत्र्यांच्या दाै-यामुळे फावले  बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक येथे आले होते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व वरिष्ठ अधिकारी हे नाशिक येथे गेले होते. यातून तीन विस्तार अधिका-यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नोटीसा बजावलेल्या ९ जणांची चाैकशी केली. चाैकशीवेळी संबधितांनी त्यांच्या कार्यकाळात निधी खर्च केल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   २०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी शहरात केलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप व तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. यानुसार ही चाैकशी सुरु आहे.