शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील वाळूवर पथकांचा वॅाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या वाळू  वाहतूकदारांकडून महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भातील परिपत्रकातील अटी व शर्तींचे पालन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या वाळू  वाहतूकदारांकडून महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भातील परिपत्रकातील अटी व शर्तींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले तपासणी पथक नेमण्यात यावे. तसेच यासाठी तत्काळ चेक नाके उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीच्या कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार परराज्यातून वाळू व रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करणे बंधनकारक राहील. परराज्यातून वैध मार्गाने येणाऱ्या वाळूची अनुज्ञप्ती क्षेत्रीय कार्यालयाने तपासून त्या राज्यातून आलेली वाळू वैध परवान्याद्वारे आल्याची खात्री करावी. संबंधित व्यक्ती किंवा संस्था स्वत:च्या वापरासाठी परराज्यातून आणलेला वाळूसाठा न करता सरळ बांधकामाच्या ठिकाणी नेणार असल्यास सदर व्यक्ती किंवा   संस्थेकडे त्या राज्यातील वैध वाहतूक पास परिमाणासह असणे आवश्यक आहे.संबंधित व्यक्ती किंवा संस्था वाळूचा साठा करून विक्री करणार असल्यास महाराष्ट्र राज्य गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मधील तरतुदीनुसार व्यापारी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार व्यापारी परवान्याचे नूतनीकरण करण्यात येईल. परराज्यातून रस्त्याने अथवा जलमार्गाने आणलेली वाळू महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करणार असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परराज्यातील रेल्वेने आलेली वाळू ज्या रेल्वेस्थानकावर रिकामी करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यात संबंधिताने राज्य शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या स्वामित्वधन दराच्या १० टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक राहील. संबंधित रकमेचा भरणा केल्यानंतर झिरो रॉयल्टी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे.परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा संबंधित व्यक्ती किंवा संस्था करणार असतील तर ती जमीन अकृषक असली पाहिजे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती किंवा संस्था यांनी वाळूचा साठा व विक्री होणाऱ्या वाळूची दैनंदिन नोंद साठा नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. सदर नोंदवहीची क्षेत्रीय कार्यालयाकडून तपासणी करण्यात येईल. परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा वैध परवान्यापेक्षा जास्त आढळल्यास किंवा झिरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केलेली आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार दंडात्मक कारवाईस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.