शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण आढळलेल्या क्षेत्रात सातवेळा फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 20:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाने बाहुबली मशिनच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाने बाहुबली मशिनच्या सहाय्याने बाधित क्षेत्रात सातवेळा औषधाची फवारणी केली. दरम्यान, औषध फवारणी करण्यासाठी पालिकेला शहरातील ट्रॅक्टर व्यापारी व शेतकऱ्यांनीही लहान ट्रॅक्टर उपलब्ध करून देत सहकार्य केले.लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहादा तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण होते. दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनमध्येही तालुका कोरोनामुक्त रहावा म्हणून नागरिक व प्रशासन दक्ष होते. त्यामुळे शहादा तालुका ग्रीन झोनमध्ये मोडत असल्याने २१ एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट मिळेल, अशी शहादेकर अपेक्षा ठेवून होते. परंतु तत्पूर्वीच शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने शहरात लॉकडाऊन शिथील होण्याऐवजी अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनास घ्यावा लागला. या काळात कोरोनाचा संसर्ग शहरात वाढू नये म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने बाधित परिसर सॅनिटायझेशन करण्यास सुरवात केली. याकामी शहरातील ट्रॅक्टर व्यापारी व शेतकऱ्यांनी पालिकेस ट्रॅक्टर व औषध फवारणीचे महाबली मशिन देऊन सहकार्याचा हात पुढे केला. पालिकेने कोरोना रुग्ण सापडलेल्या परिसरात महाबलीच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल सातवेळा फवारणी केली असून आता शहरातील प्रत्येक प्रभागात फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख आर.एम. चव्हाण यांनी दिली.