शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अन् बेसहारा वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : असहाय आणि बेघर असलेल्यांच्या जिवनात नेहमीच अंधार असतो. उदासवाने जीवन जगणाऱ्यांना नंदुरबार पालिकेने आधार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : असहाय आणि बेघर असलेल्यांच्या जिवनात नेहमीच अंधार असतो. उदासवाने जीवन जगणाऱ्यांना नंदुरबार पालिकेने आधार दिला आहे. अशा या असहाय वृध्दांचा जीवनात क्षणभर आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या हस्ते केक कापणे, मिठाई देणे, त्यांचा हृदयसत्कार करणे आणि भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बेसहारा वृद्धांनी दिलेला आशिर्वादाने उपस्थितही भारावले.जागतिक बेघर दिनानिमित्त नंदुरबार पालिकेतर्फे सुरू असलेल बेघर निवारामध्ये जागतिक बेघर दिनानिमित्त साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय सप्ताहाचा शुभारंभ देखील करण्यात आला.कुठलाही निवारा व आधार नसलेल्या बेघर लोकांसाठी हक्काचा सहारा मिळावा यासाठी तीन वर्र्षाींपूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतुन नगर परिषदेच्या शाळा क्र.१ येथे निवार उभारण्यात आला. याच निवाºयात १० आॅक्टोबर जागतिक बेघर दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचाही शुभारंभ करण्यात आला.यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वसावे, महिला व बालकल्याण समिती सभापती कल्याणी मराठे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, माजी अभियंता जी.बी.लोखंडे, प्रितम ढिंढोरे, जयहिंद फाऊंडेशनचे दिग्विजय गिरासे,बार्टीच्या मिनाक्षी दांडवेकर, सारिका बेलकर, सुवर्ण जयंती अभियानाच्या मानसी मराठे उपस्थित होते.सप्ताहात निवारा स्वच्छता, निवारा निर्जंतुुकीकरण, निवारा लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, नविन घरवासीयांसाठी शोध मोहिम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बेघर व अनाथांसाठी कायमस्वरूपी निवारा उभारण्याकरीता नगर परिषदेव्दारा जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून लवकरच प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी निवारा वासीयांसोबत केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना दात्यांव्दारे देण्यात आलेल्या वस्तु त्यात ब्लॅकेट, मच्छरदानी वाटप करण्यात आली.अभियंता लोखंडे यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. अ‍ॅड. शुभांगी चौधरी व अ‍ॅड. रश्मी महाले यांच्याकडून मिठाई वाटप करण्यात आली. सूत्रसंचलन मानसी मराठे यांनी केले. कार्यक्रमासाठी निवारा व्यवस्थापक जितेश शर्मा, काळजीवाहक सायराबी काकर यांनी परिश्रम घेतले.पालिकेतर्फे अद्ययावत इमारतसाकारणार...बेघर, असाह्य लोकांना निवारा मिळावा यासाठी पलिकेने आता नवीन अद्ययावत इमारत उभी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आराखडा तयार करून शासनानकडे मदतीची मागणी करण्यात येणार आहे. सध्या या निवारागृहाचा खर्च पालिका कुठलाही फंड न येता करीत आहे. काही दाते देखील मदत करीत आहेत. आणखी काही जणांना येथे सामावणार आहेत.