शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: चूप चूप बैठे हो जरूर कोई बात है..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:00 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पक्षांतराच्या वादळात जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरतेचे सावट निर्माण झाले असतांना जिल्ह्यातील काँग्रेसची ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्षांतराच्या वादळात जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरतेचे सावट निर्माण झाले असतांना जिल्ह्यातील काँग्रेसची धूरा सांभाळणारे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी हे निवडणुकीच्या घडामोडीत अद्यापही पूर्वीप्रमाणे प्रभावीपणे सक्रीय न झाल्याने अनेक नवीन चर्चाना उधान आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा राखीव आहेत. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसची धूरा गेल्या काही वर्षापासून जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हेच सांभाळत आहेत. त्यामुळे जिल्हाभर त्यांचा वैयक्तिक प्रभाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये त्यांची भुमिका काँग्रेस पक्षात महत्वाची राहिली आहे. गेल्या वर्षी आजारपणामुळे वर्षभर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे फारसे सक्रीय नव्हते. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आता सार्वजनिक जिवनात सक्रीय झाल्याने या विधानसभा निवडणुकीत ते अधीक सक्रीय होतील असा काँग्रेस कार्यकत्र्याचे म्हणने आहे.सध्या जिल्ह्यातून काँग्रेसच्या दोन मोठय़ा कार्यकत्र्यानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत तसेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील हे दोन्ही नेते भाजपवासी झाले आहे. त्यांना पक्षांतरापासून रोखण्याचा  काँग्रेसचा प्रय} झाले नसल्याची चर्चा आहे. किंबहुना पक्षांतराची चर्चा आता बडय़ा नेत्यांभोवतीच येवून घोंगाळत आहे. आमदार रघुवंशी हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चार महिन्यांपूर्वी चर्चा होती. त्यावेळी त्यांनी स्वप्नातही काँग्रेस सोडण्याचा विचार येणार नाही असा खुलासा केला होता. त्यानंतर ही चर्चा थांबली होती. आता पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडे नुकताच कौटूंबिक कार्यक्रम झाला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी देखील मिश्किलपणे काही चर्चा रंगल्या होत्या. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्याचे पक्ष पातळीवर चर्चा आहे. पक्षाचे सूत्र सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अॅड.के.सी.पाडवी यांच्याकडे आहे. राज्याच्या समितीवर त्यांची निवड झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यात मात्र आमदार रघुवंशी यांच्या व्यक्तीगत सर्वच मतदारसंघात प्रभाव आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते चारही विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आहे. एरव्ही कुठलीही निवडणूक लागली की आमदार रघुवंशी यांचे जिल्हाभर दौरे, मेळावे सुरू होतात. विरोधकांवर आक्रमकपणे ते शब्द शैलीतून वार करतात. त्यामुळे राजकारणात रंगत येते आणि काँग्रेस कार्यकत्र्यामध्येही उत्साह संचारतो. यावेळी मात्र अद्याप तरी तशी स्थिती निर्माण झालेली नाही. रघुवंशींनी स्थानिक स्तरावर घेतलेल्या कार्यकत्र्याच्या बैठका, नेत्यांशी हितगूज वगळता जाहीरपणे ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी समोर आलेले दिसत नाही. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये पुन्हा किंतू, परंतूचा शंका सुरू झाल्या असून आमदार रघुवंशी कधी पूर्वीप्रमाणे काँग्रेस कार्यकत्र्यामधील मरगळ दूर करण्यासाठी मैदानात उतरतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.