शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

दुकान मालकाच्या प्रसंगावधानामुळे फसवणूक टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

शहरातील डोंगरगाव रस्त्यावर माजी नगरसेविका शोभा दिलीप जैन व दिलीप जैन यांचे गुरू गौतम प्रोव्हिजन हे किराणा मालाचे दुकान ...

शहरातील डोंगरगाव रस्त्यावर माजी नगरसेविका शोभा दिलीप जैन व दिलीप जैन यांचे गुरू गौतम प्रोव्हिजन हे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानात घरगुती सर्व किराणा मालाची विक्री होत असते. सद्या या दुकानासमोर मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे सर्वच उद्योग-व्यवसाय, व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. दुकानदाराकडून मालाची उचल कमी झाली आहे. त्यातच घरगुती किराणा वस्तूचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचा बजेट चुकला आहे. शहादा परिसरात व शहरात सोन्याच्या दुकानावरून सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याची चोरी करणे, कपड्यांच्या दुकानावर जाऊन खरेदी करण्याच्या बहाण्याने महिला साड्या, फॅन्सी कपडे चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घरोघरी जाऊन महिलांना साडी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचा बहाणा करत त्यांच्याकडून घरातून चोरी करणे अशा अनेक घटना घडत असतानाच बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ३५ ते ५० वयोगटातील नऊवारी साडी परिधान केलेल्या दोन महिला या दिलीप जैन यांच्या गुरू गौतम प्रोव्हिजन दुकानावर माल खरेदी करण्याकरिता पोहोचल्या. त्यांच्या हातात युरिया खताची खाली मोठी पिशवी होती. एका महिलेने दुकानात असलेल्या रफीक नावाच्या नोकराला २५ किलो डाळ मोजायला लावली. ती मोजल्यानंतर २५ किलो तांदळाचे मोजमाप करण्यास सांगितले. याच दरम्यान एका महिलेने मोजलेली पिशवी काही अंतरावर ठेवून आली. तांदूळ मोजल्यानंतर पुन्हा एक वस्तू मोजण्याचा बहाणा केला. याचदरम्यान नोकर रफीकला आपल्याला ठगवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच त्याने डाळीची गोणी कुठे आहे, असे विचारले असता महिलांची तारांबळ उडाली. त्याचवेळेस दुकान मालक दिलीप जैन बाजूच्या दुकानात उभे असताना त्यांच्याकडून महिलांची चौकशी केली. महिलांची बोबडी वळायला लागली. संबंधित महिलांनी दुकान मालकाला परत आणून त्या ठिकाणाहून पोबारा केला. दुकान मालक जैन हे त्या महिलांना आरोळ्या मारून बोलवत असताना महिलांनी मात्र डोंगरगाव रस्त्याकडे पटापट चालण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिला धुळ्याच्या असल्याचे बोलले जात आहे. महिलांनी तिथून पळ काढल्यामुळे दुकानातील नोकराला ठग बनण्यापासून वाचवण्यात आले. सद्या अशा काही महिला घरोघरी, दुकानात जाऊन बहाण्याने ठग बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनांचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान जरी असले तरी नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. अनोळखी महिला किंवा पुरुष दुकानावर, घरोघरी, कॉलनीत आढळल्यास संबंधित नागरिकांनी शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याशी संपर्क करावा, असे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.