शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात शॉक लागून हमाल जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास  एका दुकानात हमालाला विजेचा शॉक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास  एका दुकानात हमालाला विजेचा शॉक लागल्याने त्याच्या डोक्याला व कमरेला जबर मार लागल्याची घटना घडली. जखमीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये असलेल्या काही दुकानदारांनी वायरमनला हाताशी धरून बेकायदेशीर वीजपुरवठा घेतला आहे. या दुकानदारांकडून संबंधित वायरमनला महिन्याला 400 ते 500 रुपये दिले जातात. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिपरिप आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचलेले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवार व गुरुवारी पहाटे भाजीपाल्याचा लिलाव होतो. त्या दिवसाच्या आदल्या रात्रीपासूनच तालुका व तालुकाबाहेरचे भाजीपाला विक्रेते रात्री भाजीपाला मार्केटमध्ये येतात. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सूर्यकांत बंडू सोनवणे हे भाजीपाला मार्केटमध्ये हमाली काम करीत असताना बेकायदेशीरपणे घेतलेल्या वीज कनेक्शनच्या वायरीतून वीज प्रवाह उतरल्याने त्यांना शॉक लागला. त्यात सोनवणे हे फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला व कमरेला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. त्यांना येथील डोंगरगाव रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, भाजीपाला मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी बेकायदेशीर वीज कनेक्शन घेतले आहे. वायरमनला हाताशी धरुन महिन्याकाठी 400 ते 500 रुपये एका दुकानदाराकडून दिले जातात. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू असताना त्याकडे वीज कंपनीच्या अधिका:यांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. बेकायदेशीर वीजपुरवठय़ाला सहकार्य करणा:या वायरमन व अधिका:यांची चौकशी करण्याची गरज आहे.