लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/नवापूर : पेट्रोल-डिझेलची भाववाढ, केंद्राचा कृषी कायदा आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी नंदुरबार, शहादा व नवापूर येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.शहाद्यात घोषणाबाजीकेंद्र शासनाने केलेल्या शेतकरी हिताविरोधी केलेला कृषी कायदा रद्द करावा यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून संबोधणारे त्याचप्रमाणे या आंदोलनाला चीन व पाकिस्तान पैसा पुरवत असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात निषेध आंदोलन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलच्या किमती अत्यंत कमी असताना केंद्र शासन यात दररोज वाढ करून जनतेची पिळवणूक करीत आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यात येऊन केंद्र शासनाने त्वरित डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात. केंद्र शासनाने कृषी कायद्यांना मंजुरी दिली. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, धनिकांचा व व्यापाऱ्यांचा फायदा होणार असल्याने हे कायदे रद्द करावे आदी मागण्या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी केल्या. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्यासह जिल्हा उपप्रमुख सखाराम मोते, जिल्हा संघटक मधुकर मिस्तरी, शहर प्रमुख रोहन माळी, तालुका संघटक भगवान अलकारी, शहर संघटक गणेश चित्रकथे, तालुका उपप्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, बापू सूर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, बापू चौधरी, दिलीप पाटील, सुरेश मोरे, गुलाब सुतार, प्रवीण सैंदाणे, बिपीन सोनार, इद्रीस मेमन, चुडामण पाटील, प्रदीप निकुंबे, विनोद पाटील, राहुल चौधरी, नाना बिरारे, प्रशांत नायक, प्रकाश शिरसाठ, वसीम अन्सारी, अशोक ईशी, ऋषिकेश शिवदे, अक्षय वाडिले, नीलेश पाटील, तौसिफ खान, अशपाक काझी, राजेश भावसार, सुदाम लोहार, सतीश पाटील, लहू बागले व शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.नवापुरात तहसीलदारांना निवेदनकेंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नवापूर तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. नवापूर शहरातील बसस्थानक परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शनिवारी सकाळी नवापूर शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, तालुका प्रमुख रमेश गावित, तालुका उपप्रमुख देवका पाडवी, प्रवीण ब्रह्मे, शहर प्रमुख गोविंद मोरे, शहर उपप्रमुख अनिल वारुळे, मनोज बोरसे, राहुल टिभे, दिनेश भोई, किसन कोळी, गणेश चौधरी राजेंद्र गावीत, गोपी सैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हसमुख पाटील म्हणाले, लॉकडाऊनचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे. नागरिकांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने केलेली इंधन दरवाढ चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करून विरोधात घोषणा देण्यात आल्या.
नंदुरबारला मोटारसायकल ढकलत नेवून काढली रॅलीपेट्रोल, डिझेल व महागाई विरोधात केंद्र शासनाचा जाहीर निषेध व शेतकरी आंदोलनाविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यामुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे येथील नेहरू पुतळा परिसरात संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच मोटारसायकल ढकलत नेवून रॅली काढण्यात आली. या वेळी जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, मनोज चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक प्रवीण गुरव, मनीष बाफना, अर्जुन मराठे, रवींद्र पवार, दीपक दिघे, शहर प्रमुख राजधर माळी, तालुका संघटक जगदीश पाटील, पंडित माळी, तालुका उपप्रमुख सागर मराठे, सर्व शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.