तहसील कार्यालयाचा सभागृहात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रत्येक टेबलावर चार कर्मचारी असे आठ टेबलांवर तीन फेऱ्यामध्ये तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली. पावणे तीन तासात संपूर्ण निकाल जाहीर झाला. यावेळी प्रत्येक गावात नेमून दिलेले निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फेरीनिहाय मतमोजणी...
मतमोजणीच्या एकूण आठ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत कोठलीतर्फे सारंगखेडा, टेंभेतर्फे सारंगखेडा, टेंभेतर्फे शहादा, फेस, नागझिरी, कवठळतर्फे सारंगखेडा, मनरद, कानडीतर्फे शहादा, पुसनद आदी गावांचा समावेश होता. दुसऱ्या फेरीत शेल्टी, कुकावल,कोटबांधणी, कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा, बामखेडातर्फे तऱ्हाडी, कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा,
बामखेडा, डामरखेडा, राणीपूर, सोनवद आदी. तिसऱ्या फेरीत असलोद, सारंगखेडा, मोहिदेतर्फे शहादा, तोरखेडा आदींचा समावेश होता.