शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार शेतकऱ्यांचा सातबारा झाला कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून त्यातील २४ हजार ६७१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकºयांना त्यांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात तात्काळ आधार प्रमाणिकरणास सुरूवात करण्यात आली होती. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी .पाडवी यांनी प्रत्येक पात्र शेतकºयाला योजनेचा लाभ मिळेपर्यंत कर्जमुक्तीची प्रक्रीया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यातील महसूल यंत्रणा आणि सहकार विभागाने परस्पर समन्वयाच्या माध्यमातून आधार प्रमाणिकारणाचे चांगले नियोजन करण्यात आले. आधार प्रमाणिकरणातील अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या.सहकार विभागामार्फत ग्रामीण भागात पाच पथके तयार करून शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्यात आले.या पथकांनी दुर्गम भागातील शेतकºयांपर्यंत योजनेची माहितीदेखील पोहोचवली. काही शेतकºयांच्या हंगामी स्थलांतरामुळे येणाºया अडचणीतूनही या पथकांनी मार्ग काढत अधिकाधीक शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले.नंदुरबार तालुक्यात ९,४१८, नवापूर तालुक्यात ३,३६४, तळोदा १,७४६, अक्कलकुवा तालुक्यात २,१७९, शहादा तालुक्यात ७,११७ आणि धडगाव तालुक्यात ९४७ अशा एकुण २४ हजार ७७१ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. प्रमाणिकरण झालेल्या शेतकºयांच्या खात्यात लाभाची रक्कम वितरीत करण्याचे कामदेखील तात्काळ करण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यात ९,३७५ शेतकºयांच्या खात्यात ७१ कोटी ३० लाख, नवापूर तालुक्यातील ३,३५८ शेतकºयांच्या खात्यात २३ कोटी एक लाख, तळोदा १,७२२ शेतकºयांच्या खात्यात १५ कोटी ३६ लाख, अक्कलकुवा तालुक्यात २,१७१ शेतकºयांच्या खात्यात १५ कोटी आठ लाख, शहादा तालुक्यात ७,१०४ शेतकºयांच्या खात्यात ५८ कोटी आठ लाख आणि धडगाव तालुक्यातील ९४४ शेतकºयांच्या944 खात्यात तीन कोटी ६३ लक्ष असे एकूण २४ हजार ६७१ शेतकºयांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत शेतकºयांच्या खात्यातही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.जिल्ह्यात केवळ ३९८ पात्र शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण राहिले असून त्यासाठी मोहिम स्तरावर सहकार विभागाच्या पथकामार्फत काम सुरू आहे.लवकरच सर्व पात्र लाभार्थी कर्जमुक्त होऊन नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरतील, अशी माहिती सहकार उपनिबंधक अशोक चाळक यांनी दिली आहे.

  • अद्यापही अनेक शेतकरी वंचीत...
  • कर्जमुक्तीपासून अद्यापही अनेक शेतकरी वंचीत आहेत. विविध अटी व शर्र्तींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. आधार प्रमाणीकरण केलेले असतांना देखील अनेकांना फिरवाफिरव झालेली आहे. त्यामुळे पात्र सर्वच शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा व त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. याबाबत सहकार विभागाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.