शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात सेतू अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. असे असले तरी ऑनलाइन व ऑफलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. शाळा ...

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. असे असले तरी ऑनलाइन व ऑफलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण विभागाने ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) सुरू केला आहे. शाळा बंद असल्याने काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम प्रभावी ठरणार आहे. ४५ दिवसांच्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवले जाणार आहे. गावातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. यंदा ज्या वर्गात विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला असेल त्या वर्गाच्या मागील वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित सेतू अभ्यासक्रम असल्याने मागील वर्षाचे शैक्षणिक नुकसान या उपक्रमातून भरून काढण्यात येईल. १५-१५ दिवसांच्या अंतराने तीन टप्प्यात हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा १ जुलै ते १४ जुलै, दुसरा टप्पा १६ जुलै ते २९ जुलै व तिसरा टप्पा ३१ जुलै ते १४ ऑगस्ट असा आहे. या अभ्यासक्रमात १५, ३० व ४५ व्या दिवशी याप्रमाणे तीन चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची प्रगतीदेखील तपासली जाणार आहे. सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवसंजीवनी देणारा ठरणार असल्याने शिक्षकांबरोबरच पालक, ग्रामस्थ आणि गावाचे तलाठी, पोलीस पाटील, शिक्षण समितीचे पदाधिकारी, सरपंच, पं. स. सदस्य सारेच या शैक्षणिक हवनात सहकार्य करून आहुती टाकत आहेत. तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षक गटागटाने गावात जाऊन गावातील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून मार्गदर्शन करीत आहेत. या कामात शिक्षकांना गावातील पालक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचेदेखील सहकार्य मिळत आहे. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर, समाज भवन अशा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा भरवून सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात सर्वच शाळांतर्फे सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याने गावागावांत शिक्षणाचा सेतू बांधला जात असून याकामी सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने सेतू अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.