शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्ड फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून राज्यात कुठेही चार हजार किलोमीटर प्रवास करण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन मंडळाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून राज्यात कुठेही चार हजार किलोमीटर प्रवास करण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन मंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या कार्डासाठी तळोदा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांची फरफट होत आहे. कारण त्यांना येथून कार्डाची  प्रक्रिया करण्याकरीता अक्कलकुवा डेपोत जावे लागत आहे. परंतु काम होत नसल्यामुळे त्यांना परत यावे लागत आहे. महामंडळाच्या धुळे विभागाने तळोद्यातच सुविधा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी ज्येष्ठांची अपेक्षा आहे.राज्य शासनाच्या एस.टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीसाठी नुकतीच स्मार्टकार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना या स्मार्ट कार्डावर राज्यातून वर्षभरात चार हजार किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. महामंडळाच्या आदेशाच्या पाश्र्वभूमिवर अक्कलकुवा आगार प्रमुखांकडून स्मार्ट कार्डाची                 प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना 55 रूपयात हे              कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी  संबंधीतांनी आपले मतदान कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, रहिवासी दाखला आदी तत्सम कागदपत्रांची पूर्तता करावयाची              आहे. मंहामंडळाच्या या आकर्षक प्रवास सवलत योजनेमुळे           साहजिकच ज्येष्ठ नागरिकही            प्रभावीत झाले असून, अक्कलकुवा आगाराकडे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांची अक्षरश: झुंबड होत           आहे.तळोदा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकदेखील कार्डाची प्रक्रिया करण्यासाठी अक्कलकुवा येथे जात आहेत. तथापि तेथे रांगेत उभे            राहूनही काम होत नसल्यामुळे रिकामे हात परत यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. एकाच कर्मचा:याची याकामी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यालाच संगणक संचावर माहिती भरण्याची प्रक्रिया करावी लागत आहे. त्यातच कनेक्टीव्हीटीच्या समस्येमुळे रांगेत तास्न तास उभे राहून ज्येष्ठ अक्षरश: वैतागले आहे. त्यातच आज या, उद्या या अशा मनमानीमुळे नाहक हेलपाटे मारून आर्थिक भरुदड सोसावा लागत असल्याची व्यथादेखील त्यांनी बोलून दाखविली. वास्तविक अक्कलकुवा आगारात साधारण दोन हजार ज्येष्ठ नागरिकांनी अध्र्या तिकिटाच्या प्रवासाचा पास काढला आहे. त्यामुळे एवढय़ा लाभाथ्र्याची संख्या पाहून कर्मचारी संख्या वाढविणे अथवा खाजगी सुविधा केंद्र देणे अपेक्षित होते. या उलट अक्कलकुवा येथेच नागरिकांना बोलावून महामंडळाने गैरसोय केल्याचा आरोप या नागरिकांनी             केला आहे. आधीच तेथे अक्कलकुवा तालुक्यातील पासधारक विद्याथ्र्याचा भार, त्यात पुन्हा स्मार्ट कार्डाच्या कामाची भर. परिणामी धड कुठलेच काम होत नसल्याचेही नागरिक सांगतात. तळोदा तालुक्यातील ज्येष्ठांची कार्डासाठी होत असलेली फरफट लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागाने तळोदा स्थानकातच ही सुविधा उपलब्ध  करून द्यावी, अशी मागणी होत        आहे. एस.टी. महामंडळाच्या स्मार्ट कार्डाच्या आकर्षक योजनेला तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून शिवाय कर्मचा:यांवर इतर कामांचा वाढता भार लक्षात घेऊन अक्कलकुवा येथील आगार प्रमुखांनी तळोदा बसस्थानकात ही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या धुळे विभागाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. अक्कलकुवा आगारात स्वतंत्र कर्मचारी नेमून तसा फलक लावण्यात आला आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी दोन ते चार अशी वेळ ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संगणकात लाभाथ्र्याची कागदपत्रासह पूर्ण माहिती भरल्यानंतर प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसात स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.