शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत पाठवा विकास करून दाखवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : विधानसभेत मला पाठवा. समाज व सर्वासाठी कामे करुन कायापालट करुन दाखवेन असे विचार जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : विधानसभेत मला पाठवा. समाज व सर्वासाठी कामे करुन कायापालट करुन दाखवेन असे विचार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी व्यक्त केले.  आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात व भाजपा पक्ष प्रवेशाबाबत विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी पालिकेच्या   नगरभवनात भरत गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थक मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी भरत गावीत म्हणाले की राजकारणातील बारकावे हे मी माणिकराव गावीत यांच्या कडूंनच शिकलो. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांनी 700 कोटी रुपयांचा निधी आणून विकासाचे नियोजन करून विकास कामे केलीत. तसे नियोजन नवापुरच्या विकासासाठी करावयाचे असुन त्यासाठी सत्ताधारी पक्ष भाजपात जाऊन काम करावे लागणार आहे असे ते म्हणाले.  लोकांची साथ मिळत असून ही साथ कायम राहील्यास लोकांच्या सहकार्याने तालुक्यात विकासाची गंगा वाहती करू असे आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी मला विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन त्यांनी केले.  यावेळी जेष्ठ नागरीक नकुल गावीत, ईश्वर गावीत, विवेक वळवी, रमेश गावीत, दीपक पाडवी, बालू गावीत, माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह, बोकलझरचे सरपंच राहुल गावीत, कमलेश पाटील, रसूल पठाण, आर. सी. गावीत व पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावीत यांनी भरत गावीत यांच्या समर्थनार्थ विचार व्यक्त केले.यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटनेते गिरिष गावीत, जिल्हा परिषद सदस्या संगिता गावीत, सरपंच राहुल गावीत, नगरसेवक अय्युब बलेसरिया, नगरसेविका मंगला सैन, बबीता वसावे, दर्शन पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, रमेशचंद्र राणा, कमलेश मोरे, राजेश गावीत,अजय गावीत, सारिका पाटील, बंटी चंदलानी, चंद्रकांत नगराळे, विजय सैन, जैनु गावीत,   कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गावीत, दिलीप गावीत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रकाश गावीत यांनी केले तर पालिकेचे गटनेते गिरीष गावीत यांनी आभार मानले.