शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

खविसं चेअरमन निवडीत काँग्रेसमधील चौघांच्या बंडखोरीने सेना-भाजप विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुका शेतकरी संघात रिक्त असलेल्या चेअरमनपदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़  निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीने यश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुका शेतकरी संघात रिक्त असलेल्या चेअरमनपदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़  निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीने यश प्राप्त करत संघावर वर्चस्व प्रस्थापित केल़े कॉग्रेसच्या चौघांनी बंडखोरी केल्याने शिवसेना-भाजप  आणि काँग्रेसची सदस्य संख्या समान झाली होती़ शेवटी ईश्वरचिठ्ठी काढून सेनेच्या रेखाबाई आमश्या पाडवी यांना विजयी घोषित करण्यात आल़ेअक्कलकुवा शेतकरी संघाचे तत्कालीन चेअरमन दौलतसिंग गुलाबसिंग पाडवी यांच्या मृत्यूनंतर चेअरमनपदाच्या रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती़ यांतर्गत शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने बी़बी़अहिरे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली होती़ सकाळी 11 वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना व भाजप युतीतर्फे रेखाबाई आमश्या पाडवी तर काँग्रेसतर्फे दौलतसिंग पाडवी, बीजाबाई दौलतसिंग पाडवी या दोघांनी अर्ज दाखल केला होता़ दरम्यान बीजाबाई पाडवी यांनी अर्ज मागे घेतल्याने रेखाबाई पाडवी व दौलतसिंग पाडवी यांच्यात सरळ लढत झाली़ खरेदी विक्री संघाच्या 17 सदस्यांपैकी काँग्रेसचे 12, शिवसेनेचे 3 तर भाजपाचा 1 सदस्य आह़े यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराची निवड निश्चित मानली जात असताना काँग्रसेच्या चार सदस्यांनी बंडखोरी केली़ त्यांनी सेना-भाजप युतीच्या उमेदवाराला पसंती दिल्याने दोघा पक्षांकडे आठ-आठ सदस्य झाले होत़े  पिठासीन अधिकारी अहिरे यांनी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला़ यानुसार तीन वर्षीय हार्दिक सुनील पवार या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली़ यात रेखाबाई पाडवी यांचे नाव आल्याने त्यांची चेअरमनपदी निवड झाली़ शिवसेनेला प्रथमच खरेदी विक्री संघात यश मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत होता़ काँग्रेसचे अमृत भटू चौधरी , मन्सूर इब्राहिम मेमन, साजिद अब्दुल जब्बार मक्राणी  आणि अलिम मोहम्मद यार मोहम्मद मक्राणी या चौघांनी बंडखोरी करत शिवसेनेला पसंती दिली़