शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या शोधासाठी दुर्गम भागातील डोंगरमाथ्यावर भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:35 IST

किशोर मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील लाभार्थीचे आयुष्यमान भारत योजनेसाठी कार्ड बनविण्यासाठी ...

किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील लाभार्थीचे आयुष्यमान भारत योजनेसाठी कार्ड बनविण्यासाठी इंटरनेटची कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने सीएससी ऑपरेटर यांना लाभार्थीना सोबत घेऊन डोंगरमाथ्यावर लॅपटॉप व बायोमेट्रीक घेऊन नेटची रेंज शोधावी लागत आहे. त्यातच शून्य ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थीचे बायोमेट्रीक जुळत नसल्यानेही तीही एक डोकेदुखी ठरत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची मोठी समस्या आहे. दुर्गम भागातच नव्हे तर अक्कलकुवा, मोलगी, काठी, खापर या सपाटीवरील भागातही ही समस्या आहे. सपाटीवरील भागात ही समस्या असताना अतिदुर्गम भागात तर कनेक्टीव्हीटी मिळणे फारच दूर आहे. तरीही सीएससी ऑपरेटर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटची रेंज शोधण्याचा प्रय}          करीत आहेत. सध्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेसाठी लाभार्थीचे कार्ड बनविण्याचे काम सुरू आहे.  या योजनेच्या  माध्यमातून कुंटुबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला तर त्यांच्या           वर्षभराच्या उपचारासाठी पाच लाख रूपयार्पयचा खर्च शासन करणार आहे. शासकीय आणि खाजगी रूग्णालयात या योजनेअंतर्गत लाभार्थीना लाभ मिळणार आहे. वृद्ध, अपंग लाभार्थी, ज्यांना  चालता येत नाही, उठता येत नाही त्यांच्या घरी जाऊन सीएससी ऑपरेटर जाऊन हे कार्ड बनवून देतात.  त्यासाठी लाभार्थीच्या कोणत्याही एका बोटाचा ठसा घेतल्यावर कार्ड बनविण्यात येते. तसेच ज्या लाभार्थीची नावे सुटलेली आहे, नावे चुकलेली आहे, लहान मुलांची, घरात नवीन आलेली सून त्यांची नावे कार्डात समाविष्ट करणे            गरजेचे आहे. ही नावे अपडेट झाली नाहीत तर त्यांना या योजनेपासून वंचित  रहावे लागेल. या योजनेपासून कुणीही लाभार्थी वंचित राहून नये यासाठी सीएससी ऑपरेटर प्रयत्न करीत आहेत. मात्र अक्कलकुवा तालुक्यातील  दुर्गम-अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याची समस्या मोठी आहे. नेटची रेंज शोधण्यासाठी सीएसी ऑपरेटर यांना लॅपटॉप व बायोमेट्रीक सोबत घेऊन लाभार्थीसह डोंगरमाथ्यावर भटकंती करावी लागत आहे. वायफॉय रोटरच्या मदतीने नेटची रेंज शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बीएसएनएलने यावर प्रभावी उपाययोजना करून ही समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, या भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची मोठी समस्या असताना शून्य ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थीचे कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रीक  जुळत नसल्याने ती एक डोकेदुखी ठरत आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभासाठी कार्ड बनवून देण्यासाठी काम सीएससी ऑपरेटर गावोगावी संबंधित लाभार्थीच्या घरी जाऊन माहिती गोळा करीत आहेत. मात्र जनजागृतीअभावी काही ग्रामस्थ ही योजना फसवेगिरी असल्याचे बोलून दाखवत असून  सीएससी ऑपरेटर यांना सहकार्य केले जात नसल्याचाही प्रकार काही ठिकाणी घडत आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागात या योजनेचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कोणकोणत्या रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत याची माहिती त्या रुग्णालयाबाहेर लावून जनजागृती करणे गरजेचे आहे.