शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

79 जणांची स्क्रिनिंग तर 1,244 कुटूंबावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या संपर्कातील आतार्पयत 29 जणांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या संपर्कातील आतार्पयत 29 जणांचे स्वॉब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर तब्बल 79 सेकंडरी कॉन्टॅक्टमधील लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.  मयताच्या  राहत्या घराच्या परिसरातील कंटेनमेंट झोनमधील 1,244 कुटुंबातील 5,816 इतक्या नागरिकांना वर सक्रीय लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.   शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील माता व व्यापारी असलेला पूत्र कोरोना विषाणू संक्रमितांपैकी पूत्राचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने मयत व्यापाराच्या संपर्कातील पाच नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून आतापयर्ंत यांची संख्या 29 झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रशासन कमालीचे गतिमान झाले असून सर्वत्र शोध मोहीम सुरू आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर याचा संसर्ग कसा झाला हे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. संबंधित व्यापारी हा गेल्या महिनाभराच्या कालावधीत तालुक्यातील 16 पेक्षा अधिक गावांच्या संपर्क होतात यामुळे प्रशासनाने या सर्व गावांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.मयताच्या घरातील 14 व इतर 10 असे एकूण 24 नमुने घेतल्यानंतर आज प्रशासनाने पुन्हा मयताच्या  संपर्कातील पाच नागरिकांना शोधले असून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान मयत व्यापाराच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी. आपले व आपल्या कुटुंबीयांच्या काळजी सोबत आपल्या गावाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 25 एप्रिल पयर्ंत कंटेनमेंट व बफर झोन अशा दोन गटात शहराची विभागणी केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये शोधकार्य गतीमान करण्यात आलेले आहे. संपूर्ण परीसर सिल करण्यात आला असल्याने आज सलग दुस:या दिवशी कंटेनमेंट झोन मधील परिसरात शुकशुकाट होता. रस्ते निर्मनुष्य होते, नागरिकांनी घाबरू नये प्रशासनाला सहकार्य करत शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले आहे.दरम्यान, प्रशासनातर्फे कंटेनमेंट झोनमध्ये कमालीची खबरदारी बाळगला जात असली तरी शहरातील अतिउत्साही नागरिकांनी अनेक नवीन वसाहतीमध्ये खाजगी बॅरीकेडींग लावून रस्ते बंद केले आहेत. याबाबत काही ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशी एक घटना तुळशीनगर येथील एका खासगी रुग्णालयात बाबत घडली असून या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका:यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे. या रुग्णालयाकडे येणारे रस्ते बंद करण्याचा प्रय} काही समाजकंटकांनी केल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला.  महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने रुग्णालयाला व त्यांच्या कर्मचा:यांचा सुरक्षेचे आश्वासन देण्यात आले आहे.कंटेनमेंट झोनमध्ये प्रशासनाने बॅरीकेडींग केले आहे मात्र या व्यतिरिक्त अनेक वसाहतीमध्ये करण्यात आलेले खासगी  बॅरीकेडींग हे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा:यांसाठी जाचक ठरत आहे. दूध विक्रेते व गॅस सिलेंडरचा पुरवठा करणा:यांना वसाहतीमध्ये येण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला असल्याने त्याचा फटका बसला आहे.  त्यांनी दुध व गॅस सिलेंडरचा  साठा उपलब्ध असतानाही रस्ते बंद असल्याने  पुरवठा केलेला नाही. पालिका प्रशासनाने  वसाहतीत केलेले खाजगी बेरिकेटिंग काढून टाकावे अशी मागणी जोर धरत आहे.