शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नामाची शाळा भरली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘बा विठ्ठला माङया शेतकरी राजाला सुखी ठेव, बळीराजा आनंदी तर देश आनंदी. भरपूर पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘बा विठ्ठला माङया शेतकरी राजाला सुखी ठेव, बळीराजा आनंदी तर देश आनंदी. भरपूर पाऊस पडू देण्याचे साकडे घालत भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. पटेलवाडी परिसरातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरातील मोठा मारुती मंदिर, देसाईपुरा, गणपती मंदिर परिसर व पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. पटेलवाडीतील विठ्ठल मंदिरात सकाळी सहा वाजेच्या काकड आरतीपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान सकाळी सात वाजताडॉ.प्रशांत वाघ व ब्रिजलाल चौधरी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यानंतर 10 वाजता परिसरातून वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’ सारख्या विविध धार्मिक गीते वाजवण्यात येत असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. पालखी सोहळ्यात महिलांनी फुगडय़ा खेळत आनंद साजरा केला. ठिक-ठिकाणी  महिला भाविकांनी घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करीत पूजा केली. या वेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, उपाध्यक्ष बी.डी. परमार, सुरेश पटेल, भटू पाटील, राजू पाटील, खंडू लाडकर, गोरख चौधरी, खगेंद्र पटेल, चेतन पटेल आदी उपस्थित होते. सायंकाळी मंदिरात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी विविध व्यावसायिकानी दुकाने थाटल्याने यात्रेचे स्वरूप आल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिर परिसरात यंदाही यात्रा भरली होती. यासाठी दोन दिवसांपूर्वीच पाळणा व्यावसायिक दाखल झाले होते. यात्रोत्सवात लहान मुलांसाठी अनेक करमणुकीचे साधने उपलब्ध झाल्याने बालकांनी धम्माल मस्ती केली. विविध साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यात पूजा विधीचे साहित्य, खेळणी, संसारोपयोगी वस्तुंच्या दुकानावर नागरिकांनी खरेदी केल्याने मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली.पांडुरंगाच्या दर्शनासाठी घाई गर्दी होऊ नये यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिरातील विठ्ठल व रुक्मिणी मूर्तीची आकर्षक सजावट पुजारी भूषण कुलकर्णी यांनी केली.