गुरांच्या गोठय़ात भरते कबुतरांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:45 IST
पक्ष्यांचा रहिवास पुनवर्सन वसाहतीतील एका गोठय़ात आह़े सायंकाळी येथे कबुतरांची शाळा भरल्याचा भास होत आह़े
गुरांच्या गोठय़ात भरते कबुतरांची शाळा
ऑनलाईन लोकमतरांझणी, जि. नंदुरबार, दि. 19 - तळोदा तालुक्यातील जीवननगर पुनवर्सन येथे सातपुडय़ातून स्थलांतर झालेल्या कबुतरांचे संवर्धन करण्यासाठी युवक पुढे आला आह़े कबूतरांचे नैसर्गिकरितीने पालन होत असलेल्या या पक्ष्यांचा रहिवास पुनवर्सन वसाहतीतील एका गोठय़ात आह़े सायंकाळी येथे कबुतरांची शाळा भरल्याचा भास होत आह़े जीवननगर येथील गुमानसिंग शंकर पावरा या युवकाला आठ वर्षापूर्वी सातपुडय़ाच्या वनात चार कबूतर निराश्रित असल्याचे आढळून आले होत़े गुमानसिंग याने कबुतरांना घरी आणून अन्न-पाणी आणि निवारा उपलब्ध करून देत, त्यांना बंदिस्त न करता मोकळे सोडले होत़े गेल्या आठ वर्षात त्यांची संख्या 85 च्यावर गेली आह़े दिवसभर जंगलांमध्ये फिरून ते गुमानसिंग यांच्या गोठय़ात मुक्कामास परत येत आहेत़ पक्षीसंवर्धनाच्या या अभिनव अशा प्रयत्नाचे तळोदा तालुक्यातून कौतूक करण्यात येत आह़े गोठय़ाच्या छताला लागूनच पक्ष्यांच्या अन्न आणि पाण्याची व्यवस्था गुमानसिंग यांनी केली आह़े दररोज ते स्वत: पक्ष्यांना अन्न पाणी देतात़ अंधार पडण्याच्या आत घरी परणा:या या पक्ष्यांची गुमानसिंग यांच्या घरावरील गर्दी पाहून याठिकाणी नव्याने येणारे आश्चर्य व्यक्त करतात़