शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दशामातेला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : ‘दशा माता की जय’च्या जयघोषात चैतन्यमय व भक्तीमय वातावरणात दशामाता मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : ‘दशा माता की जय’च्या जयघोषात चैतन्यमय व भक्तीमय वातावरणात दशामाता मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी शनिवारी रात्री 12 वाजेपासून येथील तापी काठावर गर्दी केली होती. येथील केदारेश्वर मंदिराजवळील तापी नदीच्या घाटावर विधीवत पूजाअर्चा करून दशामाता मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.जिल्ह्यात भाविकांनी यंदाही मोठय़ा उत्साहात दशामाता मूर्तीची स्थापना केली होती. त्यानिमित्त  दररोज पूजाअर्चा, उपवास, आरती,  भजन-किर्तन, जागरण व धार्मिक कार्यक्रम गावागावात सुरू होते. दहा दिवसांच्या या उत्सवात महाप्रसादही वाटप करण्यात आला. शनिवारी रात्री 12 वाजेनंतर ठिकठिकाणाहून वाजत-गाजत दशामाता मूर्ती विसर्जन मिरवणुका निघाल्या. त्या प्रकाशा येथील केदारेश्वर महादेव मंदिराजवळच्या तापी घाटावर दाखल झाल्या. काही गावातून विविध वेशभूषा केलेले भाविक आपापल्या पथकासह   दाखल होत होते. त्यामुळे चैतन्यमय व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विधीवत पूजाअर्चा, आरती करून दशामाता मूर्तीचे तापी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. नंदुरबारकडून येणा:या काही भाविकांनी तापी नदीवरील पुलावरूनच मूर्तीचे विसर्जन केले तर शहादाकडून येणा:या भाविकांनी गोमाई नदी पुलावरून मूर्तीचे विसर्जन केले.अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे  विविध मार्ग बंद झाले होते. हे मार्ग हळूहळू पूर्ववत होत आहेत. परंतु  संततधार सुरू असून रस्ता कधीही बंद पडू शकेल या भितीपोटी काही गावातील भाविकांनी प्रकाशा येथे न येता आपापल्या गावानजीकच्या नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन केले. असे असले तरी येथील केदारेश्वर मंदिराजवळ  दिवसभरात हजारो भाविकांनी येऊन मूर्तीचे विसजर्न केले. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर व सद्गुरू ट्रस्टतर्फे हायमस्ट दिवे लावून उजेडाची सोय केली  होती. प्रकाशा ग्रामपंचायतीने साफसफाईची कामे केली होती. पोलिस विभागामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस  निरीक्षक किसनराव नजन पाटील, 60 पोलीस व महिला कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला होता.वाहतुकीला अडथळाशहादाकडून दशामाता मूर्ती विसजर्नासाठी येणा:या भाविकांच्या वाहनांना मध्यरात्री अडीच वाजता  अडथळ्यांचा सामना करावा लागला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत  लांबोळा गावाजवळचा महामार्ग खचला आहे. परिणामी एकेरी वाहतूक सुरू होती. मूर्ती विसर्जनासाठी येणा:या वाहनांची त्यात भर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. हवालदार गौतम बोराळे व कर्मचा:यांनी नियोजन करुन वाहतूक सुरळीत केली. मध्य रात्री तीन वाजेनंतर वाहतूक सुरळीत झाली.