शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळणार असल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना देखील विमा संरक्षण मिळावे, या करिता शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोविड योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना देखील विमा संरक्षण मिळावे, या करिता शिक्षक परिषदेने राज्य शासनास निवेदन देऊन सातत्याने मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आले असून राज्य शासनाने नुकताच याबाबत शासन निर्णय जाहीर केला.कोविड योद्धा म्हणून काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना राज्यशासनाने ५० लाख विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल शिक्षक परिषदेच्यावतीने राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांकडे निवेदन देवून मागणीकडे लक्ष वेधले होते. राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक आमदार संजय केळकर, शिक्षक आमदार नागो गाणार, परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्यावतीने राज्य शासनाकडे कोविड-१९ लढ्यात जे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी आहेत, त्यांचा शासनाने रुपये २५ लाखाचा आरोग्य विमा काढावा, अशी लेखी मागणी केली होती.या मागणीचा राज्य पदाधिकाºयांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने २९ मे २०२० रोजी याबाबत शासन निर्णय पारित केला. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.