शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जैविक कचरा जाळून ‘धुर’ही होतो सॅनेटाईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:52 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल याठिकाणी वापरून झालेले जैविक मटेरीयल ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल याठिकाणी वापरून झालेले जैविक मटेरीयल कालांतराने जैविक कचरा म्हणून टाकून देण्यात येते़ या जैविक कचऱ्यातून संसर्ग होण्याचा धोका असल्याने त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावत तो जाळल्यानंतरही त्यातून निघणाºया धूरावर प्रक्रिया करण्याची पद्धत अवलंबली जात आहे़ यातून कोरोना या आजाराला अति गांभिर्याने घेण्याची गरज आहे़‘लोकमत’ने नंदुरबार येथील एकलव्य रेसिडेन्शियल आणि जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये वापलेले पीपीई कीट, हँडग्लोव्हज, मास्क, इंजेक्शन सिरींज, बाधितांनी वापरलेल्या वस्तू, जेवणाच्या प्लेट्स, चहाचे कप यासह विविध वस्तूंची विल्हेवाट कशी लावण्यात येते याचा आढावा घेतला़हा कचरा जिल्हा रुग्णालयात नियुक्त जैविक कचरा व्यवस्थापन खाजगी कंपनीकडून शहराबाहेरील निर्जन ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे़जिल्हा रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर येथे पिवळ्या रंगाच्या हाय क्वालिटी पॉलिथिन बँगांमध्ये हा कचरा जमा करण्यात येतो़ कचरा जमा करण्यात आल्यानंतर निर्धारित वेळेत नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून बंदिस्त असे वाहन आणून त्यात तीन कर्मचारी कचरा संकलित करुन त्याची शहराबाहेर तयार करण्यात आलेल्या बायमेडिकल वेस्ट प्लान्टमध्ये विल्हेवाट लावण्यात येते़दोन चेंबरमध्ये होते प्रक्रियाच्दोन चेंबरमध्ये गरम करुन जाळण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्टमधून निघणारा कार्बन डायआॅक्साईड वातावरणात जाऊन घातक होण्याची चिन्हे असल्याने वातावरणात धूर फेकणाºया चिमण्यांमध्ये पाणी सोडण्यात येते़ पाणी आणि धूर एकावेळी बाहेर पडत असल्याने घातक कार्बन डाय आॅक्साईडमधील इतर विषारी द्रव्यांचे उत्सर्जन थांबत आहे़ यामुळे हवा प्रदूषित होण्याचा धोका टाळला जात आहे़ या संपूर्ण प्रक्रियेसाठी दोन चेंबर आणि एक कचरा जाळणारे व हीट देणारे मशिन याठिकाणी लावण्यात आले आहे़ वेळोवेळी या मशिन आणि चेंबरची तपासणी करुन त्यांची देखभाल दुरूस्ती करण्यात येत आहे़१२० मायक्रोग्रॅम मीटर क्यूब अशी पातळीहवेत सोडण्यात येणाºया धुरामुळे वायूप्रदूषण होण्याचे निर्धारित प्रमाण १२० मायक्रोग्रॅम मीटर क्यूब असे ठेवण्यात आले आहे़ यापुढे आकडा वाढल्यास हवेच्या प्रदूषणात वाढ होते़ यासाठी कचरा जाळण्यात येणाºया प्लांटमध्ये आॅनलाईन मॉनिटरींग सिस्टीम लावण्यात आली आहे़कचरा जाळला जात असताना बाहेर पडणाºया धुराची धोकेदायक पातळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धुळे, मुंबई आणि दिल्लीत बसून पाहू शकतात़ आजवर १२० च्या पातळीपुढे आकडेवारी गेली नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे़दर दिवशी सुमारे ३४० किलो कचरा हा जिल्हा रुग्णालय आणि कोविड केंअर सेंटर येथील तर शहरातील इतर खाजगी रुग्णालयातूनही दर दिवशी किमान ३०० किलो कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे़शहराबाहेर सुरू असलेल्या या प्लांटमधून साधा राखेचा कणही बाहेर पडू नये यासाठी दक्षता घेतली जात असून बाहेर पडण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सॅॅनेटाईज केले जात आहे़कचरा गोळा करणारे सर्व कर्मचारी तसेच गावाबाहेरील प्लांटमध्ये कचरा जाळून त्यावर पुन्हा प्रक्रिया करतेवेळी कर्मचारी पीपीई कीट परीधान करण्यात येतात़ त्यांच्याकडून वापरण्यात आलेल्या पीपीई कीट आणि हँडग्लोव्हचीही येथेच विल्हेवाट लावण्यात येत आहे़