शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गोंडाळे शिवारात बिबटय़ा दिसल्याने एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:45 IST

ग्रामस्थांमध्ये भिती : वनविभागाकडून खबरदारीच्या उपाय योजना आवश्यक

बोरद : तळोदा तालुक्यातील गोंडाळे शिवारात बिबटय़ाने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली आह़े विद्यमान बोरद ग्रामपंचायत सदस्या इंदिरा मंगलसिंग चव्हाण यांना त्यांच्या कापसाच्या शेतात बिबटय़ाचे दर्शन झाले होत़े सध्या कापूस तसेच ऊस, पपई पिक वाढलेली असल्याने ब:याच ठिकाणी बिबटय़ांचे वास्तव्य दिसून येत असत़े त्यामुळे अनेक वेळा ऊस तोडतांना उसाच्या शेतातही बिबटय़ा तसेच बिबटय़ाच्या बछडे दिसून येत असतात़ बोरद शिवारात तर बिबटय़ाच्या पायाचे ठसेदेखील दिसून आलेली आहेत़ असाच प्रकार तालुक्यातील गोंडाळे शिवारात झाला़ इंदिरा चव्हाण आपल्या कापसाच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता, त्यांना शेतामध्ये जवळ पूर्णपणे विकसित झालेला बिबटय़ाचे दर्शन झाल़े झाडाझुडपांचा आवाज ऐकत कोणी तरी या दिशेने येत असल्याचा अंदाज बिबटय़ाला आला़ इंदिरा चव्हाण यांना सुमारे 20 फुटांवर बिबटय़ा दिसून आला़ त्यांनी तत्काळ पुढे पाऊले टाकणे बंद केले व आहे त्याच जागी काही सेकंद थांबल्या़ बिबटय़ाने चव्हाण यांच्याकडे कटाक्ष टाकून शेतात पोबारा केला़ बिबटय़ाला पाहून इंदिरा चव्हाण यांना चांगलाच घाम फुटला़ काय करायचे समजले नाही़ त्यांनी माघारी येत गावात घडल्या प्रकाराची माहिती दिली़ गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली़ परंतु तोवर बिबटय़ा दुसरीकडे गेला होता़ शेताची पाहणी केल्यावरही बिबटय़ा दिसून आला नाही़ त्यामुळे परिसरात चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े काहीच दिवसांपूर्वी बोरद शिवारात बिबटय़ाचा बछडा आढळून आला होता़ वनविभागाने मादा येण्याची वाट पाहिल्यावरही काही उपयोग झाला नाही़ त्यामुळे त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होत़े तर आताच बिबटय़ाच्या हल्यात गाईचे वासरु ठार झाले होत़े वारंवार बिबटय़ाचे दर्शन व पाळीव प्राण्यांवर हल्ला होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आह़े सध्या उसतोडीचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात बिबटे आढळून येत असतात़ मानवी वस्त्यांमध्येही बिबटय़ांचा मुक्त संचार वाढला आह़े त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आह़े या ठिकाणी बिबटय़ाची दहशत असल्याने शेतक:यांसह शेतमजूरही येण्यास धजावत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आह़े त्यामुळे मजूर टंचाईची समस्या भेडसावत आह़े दरम्यान, सध्या बिबटय़ांकडून पाळीव प्राणी  लक्ष करण्यात येत असले तरी भविष्यात यातून मनुष्य हाणी होण्याचा धोका नाकारता येत नाही़ जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच सर्वत्र तलाव तसेच जलस्त्रोत आटले आहेत़ त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात हिंडत असल्याचा अंदाज वनविभागाकडून लावण्यात येत आह़े त्यामुळे मनुष्य व वन्यप्राणी यांच्यात थेट संघर्ष होत आह़े वनविभागाकडून गावाबाहेर तात्पुरत्या स्वरुपाचे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आह़े त्यामुळे वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध होणार असून यातून ते गावात येण्यापासूनही आळा बसणार असल्याचे सांगण्यात आल़े  वनविभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े