शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशात देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : तिर्थक्षेत्र दक्षिण काशी (प्रकाशा) येथील प्रमुख केदारेश्वर महादेव मंदिर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर या सर्वच मंदिरांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : तिर्थक्षेत्र दक्षिण काशी (प्रकाशा) येथील प्रमुख केदारेश्वर महादेव मंदिर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर या सर्वच मंदिरांवर शिवभक्तांनी बम बम भोलेचा जय जयकार करत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तेथे भंडारा, लघुरुद्र, रामनाम जपसह अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. विविध व्यावसायिक दाखल झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.प्रकाशा येथील प्रमुख केदारेश्वर, काशीविश्वेश्वर महादेव मंदिरावर भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या. अशीच गर्दी पुष्पदंतेश्वर मंदिरांवरही दिसून आली. भाविकांनी सूर्यकन्या तापी नदीत पवित्र स्नान करून मंदिराचे दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, काशीविश्वेश्वर मंदिराचे अध्यक्ष दिलीप चौधरी, पुष्पदंतेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हितेश वाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळ मंदिर परिसरात उपस्थित होते. संगमेश्वर महादेव मंदिरावर देखील ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी भाविकांच्या सुविधेसाठी व्यवस्था केली.नद्यांच्या संगमस्थळावरही भाविकांची गर्दी दिसून आली. तुंबा चौधरी यांच्या परिवाराने महाभंडारा आयोजित केला, त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. गौतमेश्वर महादेव मंदिर येथे सिंहस्थ पर्वणीतील ध्वजाचे मानकरी असलेल्या गढी परिवाराने महादेवाचे दर्शन घेत भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरासह चिंतामणी महादेव, मुक्तेश्वर महादेव मंदिर आदी ठिंकाणी भावीकांची गर्दी दिसून आली. १३ वर्षाच्या अखंड परंपरेनुसार शहादा येथील जय भोले ग्रुपतर्फे भंडारा देण्यात आला. यासाठी जय भोलग्रुपने मोठा खर्च पेलवला. प्रकाशा येथील धार्मिक कार्यक्रमांमधील रामनाम जपचा तिसरा दिवस असून यासाठी पंचक्रोशीतील सुमारे हजारो उपस्थिती नोंदवली. साध्वी कमलाबेन व प.पू.संत श्री संतोष महाराज हे देखील व्यासपीठावर होते.