शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रोकडमल हनुमानाची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:09 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील उंटावद येथे रोकडमल हनुमानाचे जागृत मंदिर  असून दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुक्यातील उंटावद येथे रोकडमल हनुमानाचे जागृत मंदिर  असून दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. सालाबादप्रमाणे यावर्षीही वैकुंठ चतुर्दशी २८ व २९ नोव्हेंबर रोजी भरणारी यात्रा कोरोनाचे संभाव्य संकट पाहता खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्याबाबतचा मासिक सभेत ठराव पारित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने सरपंच सुरेश गोपाळ पाटील व ग्रामविकास अधिकारी महेश चौधरी यांनी दिली. शहादा तालुक्यात प्रख्यात  असलेले रोकडमल हनुमान मंदिर  गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावद येथे असून वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी उंटावद-होळ  ग्रामपंचायत सोयी-सुविधेसाठी तत्पर  असते. सुमारे २०० वर्षांपूर्वी गोमाई नदीच्या पुरात वाहून आलेल्या हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून उंटावद येथील मंदिर प्रसिद्ध आहे. जागृत देवस्थान असल्याने दर शनिवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. नवसाला पावणारा हनुमान म्हणून येथील देवस्थानाची प्रसिद्धी असून येथे साखर, केळीची तुला करून रोडग्याचा प्रसाद वाटप केला जातो. या मंदिराचा जीर्णोद्धार  करून मुख्य मूर्ती जागेवरून न हलविता मंदिराचा विस्तार करण्यात आला आहे. मंदिराची उंची सुमारे ५१ फूट असून दोन हजार चौरस फुटाचे भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे संभाव्य संकट टाळण्यासाठी हा यात्रोत्सव रद्द  करण्यात आला असून परिसरातील जनतेने व व्यापारी वर्गाने याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सरपंच सुरेश गोपाळ पाटील, ग्रामविकास अधिकारी महेश चौधरी, सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.