शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्तालूटीतील आरोपीस उचीशेवडीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चरणमाळ घाटात एकाची लूट करुन फरार असलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने उचीशेवडी ता़ नवापुर शिवारातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चरणमाळ घाटात एकाची लूट करुन फरार असलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने उचीशेवडी ता़ नवापुर शिवारातील शेतातून ताब्यात घेतल़े एलसीबीचे पथक तीन महिन्यांपासून संशयिताच्या मागावर होत़े चरणमाळ ता़ साक्री येथील गुलाब छगन मावची हे दूध डेअरीचे पैसे घेऊन जात असताला 12 मार्च रोजी त्यांची अज्ञात तिघांनी लूट केली होती़ याप्रकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्याकडून तपास सुरु होता़ दरम्यान रस्ता लुटीचा मुख्य सूत्रधार किशोर देवज्या गावीत हा उचीशेवडी येथील शेतात लपून बसला असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल दिनक गोरे व आनंदा मराठे हे शेतात काम मागण्याच्या बहाण्याने गेले होत़े परंतू किशोर गावीत याने दोघांच्या तावडीतून सुटून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता़ दरम्यान एलसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात तो अलगद फसला होता़ त्याची चौकशी केल्यानंतर त्याने योहान गावीत, रविदास गावीत व प्रभू होल्या अशा तिघांची नावे सांगून त्यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली़ चारही संशयितांनी सहा ते सात महिन्यांपूर्वी साक्री तालुक्यातील दहिवेल येथे कांदा व्यापा:यास तसेच गुजरात राज्यातील उच्छल येथील एका व्यापा:यास जबरीने मारहाण करुन साडेआठ लाख रुपयात लुटले होत़े चौघांविरोधात उच्छलसह नवापुर आणि विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ ढवळे, दिपक गोरे, भटू धनगर, संदीप लांडगे, राहुल भामरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र ठाकूर यांनी ही कारवाई केली़