शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामामुळे वाहतूक वळविल्याने 26 वसाहतींमधील नागरिक झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 10:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांच्या सोयीसाठी धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाला सुरु झाले आह़े यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरिकांच्या सोयीसाठी धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाला सुरु झाले आह़े यासाठी नंदुरबार-दोंडाईचा मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून ही वाहतूक नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आह़े  कोणत्याही नियमनाअभावी अवजड वाहने भरधाव वेगात कॉलन्यांमधून धावत असल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़    याबाबत धुळे चौफुली परिसरातील 26 कॉलन्यांमधील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आह़े निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोणे फाटा ते मुस्लिम कब्रस्तान या दरम्यान  पाईप मोरी बांधकाम व रस्ता काँक्रिटीकरण काम सुरु झाले आह़े यातून  मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तीन महिन्यांपयर्ंत रस्ता काम सुरु राहणार असल्याने भोणे फाटा, विश्वकर्मा मंदिर, नगराध्यक्ष वेडूभाऊ गोविंदभाऊ राजपूत मार्ग,राजपूत पेट्रोल पंप, धुळे चौफुली, जाणता राजा चौकातून वाहतूक वळवण्यात आली आह़े परंतू वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षा अधिक राहत असल्याने नागरिकांसाठी वळवलेली वाहतूक अडचणीची ठरत आह़े परिसरात फिरणा:या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह दुचाकीस्वारांना अडचणी येत आहेत़ शाळेत जाणा:या विद्याथ्र्याना या अवजड वाहनांच्या वेगाचा फटका बसू शकतो़ अवजड वाहनचालकांना कोणत्या मार्गाने जावे यासाठी मार्गदर्शक फलक नसल्याने अडचणी येत आहेत़ मध्येच वाहने वळवण्याचे प्रकार होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन रस्तेही खराब होत आहेत़ परिणामी वाहतूक वळवलेल्या मार्गावर  वाहतूक पोलिसांची नियुक्ती करुन जागोजागी गतिरोधक टाकले जावेत़ रात्रीच्यावेळी योग्य तेथे बॅरीकेटींग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आह़े  

 26 कॉलन्यांमधील नागरिकांसोबतच जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़राम रघुवंशी, नंदुरबार विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, नगरसेवक कैलास पाटील,अविनाश माळी आदींनी या प्रकाराकडे लक्ष वेधून घेत प्रशासनाला निवेदन दिले आह़े कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आह़े धुळे चौफुली परिसरातील महाराणा प्रताप नगर, जाणता राजाचौक, नेहा पार्क, गांधी नगर, राजीव गांधी नगर, राम नगर, जयंतीलाल नगर, पद्मावती नगर, देवचंद नगर, सोनाबाई नगर, सोनाई नगर, गाझी नगर, अनिल नगर, लक्ष्मीनारायण नगर, जय गुरुदेव नगर, हरिभाऊ नगर, ज्ञानदीप सोसायटी नगर, गोपाळ नगर, एलिझा नगर, वर्धमान नगर, शांती नगर, ओम शांती नगर, वाघेश्वरी नगर, रुक्मिणी नगर, शहाबाई नगरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देत समस्यांचा पाढा वाचला होता़ लवकरच याबाबत उपाययोजना होण्याची शक्यता आह़े