शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जिर्णोद्धार झालेले मंदीर जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दोन महिन्यांपूर्वीच जिर्णोद्धार केलेल्या मंदीराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दोन महिन्यांपूर्वीच जिर्णोद्धार केलेल्या मंदीराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे तर चालक जखमी झाला आहे.बºहणपूर-अंकलेश्वर महमार्गावर लांबोळा गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, शुक्रवारी रात्री शहादाकडून तळोदाकडे जाणाऱ्या भरधाव सोळा चाकी ट्रॉलाने (क्रमांक जीजे ३ बीडब्ल्यू २७७७) काही वाहनचालकांना कट मारला होता. ते वाहनचालक आपला पाठलाग करीत असल्याचा संशय आल्याने ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालविण्याचा प्रयत्न केला. लांबोळा गावाजवळ आल्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकने सरळ रस्त्यालगत असलेल्या मंदीराला धडक दिली. त्यात मंदीराचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज सायंकाळी मंदीर परिसरात ग्रामस्थ तेथे ठेवलेल्या बाकांवर बसत असतात.अपघात घडला त्यावेळी सुदैवाने कुणीही नव्हते. मंदीराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन वर्गणी देखील गोळा केली आहे. आकर्षक असलेल्या या मंदीराचा एक भाग पुर्ण जमिनदोस्त झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रकचालक देखील या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. याबाबत शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.संरक्षक जाळी उभारावी..कोळदा ते खेतिया या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बºयाच ठिकाणी काम रखडले आहे. रस्ता काम करतांना गाव व वस्ती असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत किंवा इतर अडथळे असणे आवश्यक असतांना तसे काहीही करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.