शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध ताडी विक्री केंद्राने रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात ताडी विक्रीचा कुठलाही अधिकृत परवाना नसताना मलोणी, ता.शहादा येथे राजरोसपणे रासायनिक ताडीची विक्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात ताडी विक्रीचा कुठलाही अधिकृत परवाना नसताना मलोणी, ता.शहादा येथे राजरोसपणे रासायनिक ताडीची विक्री होत आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. दिवसभर ताडी पिणाऱ्यांचे आपापसातील भांडणे, हाणामाºया, अश्लिल भाषेत संभाषण, शाब्दीक चकमकी यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना निवेदन दिल्यानंतरही आतापर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही.ताडीच्या अधिकृत विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. ज्या परिसरात ताडी विक्री केंद्र दिले जाणार आहे तेथील भागात किमान ५०० ते एक हजार ताडीची झाडे असणे आवश्यक आहे. तसा दाखला वनविभागाने दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ताडी विक्रीचा अधिकृत परवाना दिला जातो. शहादा तालुक्यातील असा एकही अधिकृत परवाना नसल्याची माहिती आहे. असे असतानाही मलोणी, ता.शहादा परिसरात बिनधास्तपणे खुलेआम ताडीची विक्री होत आहे.शहादा तालुक्याच्या वनविभागाच्या हद्दीत ताडीची झाडे नसल्याने नैसर्गिकरित्या ताडी उपलब्ध होणे शक्य नाही. असे असताना मलोणी येथील अनधिकृत ताडी विक्री केंद्रात बिनधास्तपणे रासायनिक ताडी विकली जात आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी मलोणी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट व रासायनिक ताडी विक्री करणाºयांवर कारवाई केली होती. विभागाने टाकलेल्या छाप्यात बनावट व रासायनिक ताडी निर्मितीसाठी लागणारे पावडर, रसायन आदी साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले होते. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. मात्र यातील मुख्य सूत्रधार तामिळनाडू राज्यातील ‘अण्णा’ हा फरार झाला होता. अद्यापपर्यंत तो फरार असल्याने त्याच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा या रासायनिक ताडी विक्रेत्यांनी परिसरात पुन्हा धुमाकूळ घातला आहे.२८ डिसेंबरच्या रात्री या बेकायदेशीर ताडी विक्री केंद्रात येणाºया ग्राहकांनी परिसरात मोठा धुमाकूळ घातला. या अवैध ताडी विक्री केंद्राशेजारी राहणाºया रहिवाशांच्या घराला बाहेरून कडी लावून दगडफेक केली. रात्री तीन वाजेच्या सुमारास सहा ते सात जणांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत आजूबाजूच्या घराच्या दरवाजांवरही लाथाबुक्के मारुन सुमारे एक ते दीड तास हा धुमाकूळ सुरू होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दररोज रात्रीच्या सुमारास येथे ताडी पिण्यासाठी येणाºयांमुळे रात्रभर हे दुकान सुरू असते. रोज रात्री मद्यपींच्या मोठमोठ्याने आरडाओरडा करणे, दंगामस्ती करणे, शेजाºयांना नाहक त्रास देणे असे उद्योग सुरू असतात.२८ डिसेंबरला मध्यरात्री घडलेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांनी २९ डिसेंबरला सकाळी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे परिसरात सुरू असलेल्या या प्रकाराबाबत निवेदन दिले. मात्र अद्याप कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही. या अनधिकृत ताडी विक्री केंद्राचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.मुळात येथे बेकायदेशीररित्या रासायनिक ताडीची निर्मिती करून विक्री केली जात आहे. ही बनावट ताडी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असून तिच्या विक्रीवर राज्य शासनाने बंदी घातलेली असतानाही मलोणी परिसरात बिनधास्तपणे बनावट ताडीची निर्मिती व विक्री सुरू आहे. एवढेच नव्हे तर ताडी विक्रीसाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात येथे वापर केला जातो. ताडी विक्री झाल्यानंतर वापरण्यात येणाºया प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी त्यास खुल्या मैदानात सार्वजनिक जागेत जाळले जात असून यातून पर्यावरणाचा ºहास होत आहे. त्याचप्रमाणे या ताडीमध्ये अत्यंत घातक रसायन वापरले जात असल्याने त्याच्या सेवनाने अनेकांना विविध असाध्य आजारांची लागण झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने बनावट व रासायनिक ताडी विक्री या परिसरात खुलेआम सुरू आहे.