शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारकरांसाठी आंबेबारा धरणातील जलसाठा आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:53 IST

पालिका सर्वसाधारण सभा : टंचाई दूर करण्यासाठी ठरावाला मंजूरी

नंदुरबार : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पालिकेने आंबेबारा धरणातील 80 दशलक्ष घनफूट जलसाठा आरक्षणाचा ठराव सर्वसाधारण सभेत केला़ यावेळी शहरातील मुख्य रस्ता व इतर ठिकाणी असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यासह 14 विविध विषयांना मंजूरी देण्यात आली़ पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़ सोबत व्यासपीठावर पालिका मुख्याधिकारी गणेश गिरी, उपनगराध्यक्ष शोभा मोरे उपस्थित होत़े  सभेत नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी पालिका प्रशासनाला 25 मे रोजी विकास कामांबाबत दिलेल्या पत्रावर विचारविनिमय करण्याची मागणी केली असता, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर कामे करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता यांनी दिली.सभेत शहरातील विविध ठिकाणी वाढलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांना हटवण्याबाबत ठराव करण्यात आला़ बेकायदेशीर बांधकामे सुरू असून  कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांकडून करण्यात आली़ यावर उत्तर देताना मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना येत्या काळात नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली़ दरम्यान पालिकेतील ठेकेदार कामात कसूर करीत असतील अशा ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत भाजपा नगरसेवकांनी रज्जाक पार्कमधील नाला सुधारणा करण्याच्या कामाचे ठेकेदार ठेकेदार पी. एन भावसार यांनी कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला़ या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ सभेत नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत साक्री नाका ते तलावपाडा भिलाटी पावेतो रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करणे, रस्ता दुभाजक व गटार बांधकाम, तलावपाडा ते नवापूर चौफुलीपावेतो रस्ता, खडीकरण, डांबरीकरण आणि गटार बांधकाम करण्यासाठी जयसाई कन्स्ट्रक्शन यांनी दिलेल्या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार निर्णय घेणे, पालिका हद्दीतील सव्रे क्रमांक 396 शेती विभागात समाविष्ट असलेले क्षेत्र वगळून रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत भाजपा नगरसेवकांनी घेतलेल्या हरकतींवर नगराध्यक्षा यांनी सुनावणी घेत दिलेल्या अंतिम निर्णयास मंजूरी देणे या विषयांवरही चर्चा करण्यात आली़