शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील शेतकरी रविकिरण शिंदे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या दोन ते तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील शेतकरी रविकिरण शिंदे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विहिरीत पडलेल्या दोन सापांना मोड येथील सर्पमित्र अविनाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून जंगलात सोडून देण्यात आले.याबाबत सविस्तर वृत असे की, तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील रविकिरण शिंदे यांच्या शेतातील विहिरीत जवळपास तीन महिन्यापासून दोन साप पडले होते. विहीर कामात येत नसल्याने सुरुवातीला त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. पण या विहिरीत जास्त काळ साप जीवंत राहू शकत नसल्याची व सापांपासून असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन रविकिरण यांनी त्या सापांना बाहेर काढण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य अविनाश पाटील यांना सापांबद्दल माहिती दिली व त्यांना वाचविण्यासाठी विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चर्चा केली. अविनाश पाटील व प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देत विहिरीची पाहणी केली. विहिरीला जवळपास ५० फुटापासून पाणी होते. त्यामुळे त्यांना विहिरीत उतरणे सुरक्षित नसल्याचे लक्षात आले. दोराला एक झुडूप बांधून विहिरीत टाकले आणि सापाला त्या झुडपामध्ये अडकून सुरक्षित वर काढले. सापांना वर काढल्यावर दोन्ही साप हे अत्यंत विषारी नाग जातीचे असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही विषारी सापांना जीवावर खेळून सर्पमित्रांनी त्यांना सुरक्षित त्यांच्या अधिवासात सोडले. या कामगिरीसाठी सर्पमित्रांना रविकिरण शिंदे, रवी गोसावी, गोपाळ कोळी, वसंत गोसावी व राहुल निकुंभ या युवकांनी त्यांना मदत केली. सर्पमित्रांच्या या कामाचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.