शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा काठावरील चार गावांमध्ये प्रशासनाकडून बचावकार्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : महाकाय सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील बामणी, सिंदुरी, धनखेडी आणि मणिबेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : महाकाय सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील बामणी, सिंदुरी, धनखेडी आणि मणिबेली या चार गावात पाणी शिरले होत़े याठिकाणी बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आह़े अक्कलकुवा तहसील कार्यालयाने याठिकाणी तीन कर्मचा:यांची नियुक्ती केली आह़े 16 ऑगस्टपासून सरदार सरोवराच्या बुडीत क्षेत्रात येणा:या चारही गावांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक ग्रामस्थांचे हाल सुरु झाले होत़े शेतीसह घरांमधील अन्नधान्य संपूर्णपणे पाण्यात जाऊन नुकसान झाल्यानंतरही नर्मदा विकास विभागाने याठिकाणी मदत पोहोचवली नव्हती़ यातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ सरदार सरोवराची पातळी ही 138़28 मीटर झाल्यानंतर या गावांमध्ये पाणी पातळी वाढली होती़ यात बामणी येथील दिवाल्या जुगला वसावे यांच्यासह तिघा बाधितांची घरे पूर्णपणे पाण्यात गेली होती़ त्यांच्यासाठी नर्मदा विकास विभागाने बांधलेल्या शेडचेही पत्रे उडून गेल्याने समस्या निर्माण झाली होती़ दरम्यान सोमवारी अक्कलकुवा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना परिसरातील गावातील नागरिकांनी पूराची भीषणता नजेरस आणून दिल्यानंतर बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आह़े याठिकाणी तहसीलदार यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी, मंडळाधिकारी आणि तलाठी यांची नियुक्ती केली आह़े सोमवारी पाण्याची पातळी वाढल्याने अधिकच हाल होत असल्याचे सांगण्यात आले आह़े या स्थितीवर मात करुन बाधितांना मदत देणा:या नर्मदा विकास विभागाचे अधिकारी मात्र कुठेही दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े बुधवारी तहसीलदार यांच्यासह नर्मदा विकासचे उपअभियंता हे या गावांना भेट देणार आह़े दरम्यान प्रकल्पबाधित घोषित केल्याशिवाय घरे सोडणार नसल्याचे पूरग्रस्तांकडून सांगण्यात आल्याची माहिती आह़े