शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेलेल्या कुटुंबांचे रेशनकार्ड होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

नंदुरबार : रेशनकार्डला आधार सिडिंगची मोहीम संपत नाही तोच आता लागलीच बोगस शिधापत्रिका शोधमोहीम सुरू होणार आहे. शिवाय एक ...

नंदुरबार : रेशनकार्डला आधार सिडिंगची मोहीम संपत नाही तोच आता लागलीच बोगस शिधापत्रिका शोधमोहीम सुरू होणार आहे. शिवाय एक लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे रेशनकार्ड या अंतर्गत रद्द करण्यात येणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही शोधमोहीम सुरू राहणार आहे.

राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी व शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशान्वये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयाने हे आदेश काढले आहेत. यामुळे अनेक शिधापत्रिका आता रद्द होणार आहेत. यासाठी छापील फॅार्म तयार करण्यात आला असून तो भरून द्यावा लागणार आहे. शिवाय आवश्यक कागदपत्रे पुरावे म्हणून जोडावे लागणार आहेत. यासाठी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे.

अशी असेल समिती...

बोगस शिधापत्रिका शोध मोहिमेसाठी जिल्हा स्तरावर एक समिती नेमण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणाऱ्या समितीत पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अ वर्ग नगरपालिका मुख्याधिकारी व उपनियंत्रक म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राहणार आहेत. ही समिती या मोहिमेवर देखरेख ठेवेल.

तर होणार रेशनकार्ड रद्द...

ज्या शासकीय/निमशासकीय कार्यालयातील, खासगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात येतील. त्यांच्या मागणीनुसार अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याचे कार्यवाही करण्यात येईल. यासाठी संबंधितांना आवश्यक ते पुरावे द्यावे लागणार आहेत.

यांचे होऊ शकेल रेशनकार्ड रद्द

एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन रेशनकार्ड असतील तर त्याची शहनिशा करून त्यातील एक रद्द करण्यात येईल. एकाच पत्त्यावर दोन कार्ड असतील त्या विभक्त कुटुंबामध्ये देताना त्या बीपीएल अथवा अंत्योदय अन्न योजनेचे नसतील. विदेशी नागरिकांना एकही रेशनकार्ड दिलेले असणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

कोट...

शासनाने बोगस शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील आवश्यक कागदपत्रे देऊन पडताळणीसाठी सहकार्य करणे आवश्यक राहणार आहे. एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे बाद ठरतील.

-महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार.