शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कापसाच्या विक्रमी लागवडीला अतीवृष्टीची ‘नाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चार वर्षानंतर सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात कापूस लागवड होऊनही  असून 115 टक्के कापूस लागवड पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चार वर्षानंतर सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात कापूस लागवड होऊनही  असून 115 टक्के कापूस लागवड पावसामुळे 25 टक्के क्षेत्र नुकसानीच्या गर्तेत सापडले आह़े यामुळे शेतक:यांच्या उत्पादनातही घट येण्याची चिन्हे आहेत़ यंदा दुबारचे संकट टळल्याने शेतक:यांसाठी आशादायी वातावरण निर्माण झाले होत़े परंतू पावसामुळे पिकाला फटका बसला आह़े          जिल्ह्यात 2014 पासून कापूस उत्पादनाची स्थिती यथातथाच राहिली आह़े साधारण 1 लाख 10 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आल्यानंतर त्यातून प्रती हेक्टर सरासरी 212 किलोग्रॅम उत्पादन शेतक:यांच्या पदरी पडले आह़े 2014 ते 2018 या कालावधीत पावसाची स्थिती ही असमाधानकारक असल्याने शेतक:यांना दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले होत़े यंदाच्या हंगामात आतार्पयत 95 टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतू लागवडीच्या 25 टक्के क्षेत्रात थेट आणि उर्वरित क्षेत्रात अतीवृष्टीचा फटका बसल्याचे परिणाम आता समोर येत आहेत़ यामुळे शेतकरी यंदा कापसाचे विक्रमी घेण्यापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत़ यातून शेतक:यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आह़े 

जिल््ह्यात यंदा 1 हजार 6 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होणार असे निर्धारण कृषी विभागाने केले होत़े गत चार वर्षातील उत्पादन आणि क्षेत्र यामुळे यंदाच्या क्षेत्राबाबत साशंकता होती़ परंतू उशिराने का होईना पावसाने पूर्ण क्षमतेने हजेरी दिल्याने 1 लाख 22 हजार 895 हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली होती़ यात नंदुरबार 37 हजार 505, नवापुर 9 हजार 630, शहादा 50 हजार 922, तळोदा 9 हजार 798, धडगाव 9 तर अक्कलकुवा तालुक्यात 14 हजार हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली़ दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी कापूस पिकाची वाताहत झाली आह़े कमी उंचीची झाडे सात दिवसांर्पयत पाण्यात राहिल्याने त्यांना मर आला होता़ तर काही ठिकाणी जमिनीवरुन पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास पिकांची स्थिती नाजूक झाली आह़े शहादा तालुक्यात कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती असून नंदुरबार तालुक्यातही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होत़े यामुळे या गावांमधील शेतक:यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याची मागणी आह़े प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 20 हजार हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज असला तरी 30 हजार हेक्टर कापूस पाण्यात गेल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े 

जिल्ह्यात प्रती हेक्टर सरासरी 212 किलो ग्रॅम कापूस उत्पादन घेतले जाते 2014 ते 2018 यादरम्यान उत्पादनात चढ उतार कायम राहिले आहेत़ 2014 मध्ये 1 लाख 18 हजार क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाचे उत्पादन हे 1 लाख 12 हजार टन एवढे होत़े प्रती हेक्टर 145 किलोग्रॅम उत्पादन घेतले गेल़े  2015 मध्ये 1 लाख 16 हजार हेक्टरवरील कापसाचे उत्पादन 1 लाख 106 टन एवढे होत़े हेक्टरी 161 किलोग्रॅम उत्पादन शेतक:यांना आल़े 2016 या वर्षात 80 हजार हेक्टरवरील कापसाचे 1 लाख 521 टन उत्पादन आले होत़े प्रती हेक्टरी उत्पादकता होती 303 हेक्टऱ 2017 मध्ये प्रती हेक्टर 338 किलोग्रॅम तर 2018 मधील 1 लाख 18 हजार हेक्टरवरील कापसाचे प्रती हेक्टर 267 किलोग्रॅम उत्पादन आले होत़े