शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे स्वतंत्र कोविड सेंटर आजपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

नंदुरबार : केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी रेल्वे कोविड कोच पाठविण्यात येत आहे. ...

नंदुरबार : केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी रेल्वे कोविड कोच पाठविण्यात येत आहे. त्यानुसार खासदार डॉ. हीना गावित यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे रेल्वे कोच उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. या पाठपुराव्याला यश आले आहे. नंदुरबार येथील रेल्वेस्थानकावर ११ रोजी रेल्वे कोविड कोच येणार असून, १२ एप्रिलपासून रुग्णांवर उपचारासाठी हे कोच उपलब्ध असणार असल्याची माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी दिली.

गतवर्षी देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे कोविड कोच वर्षभरापूर्वी तयार केल्या होत्या. या रेल्वे कोविड कोच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत व तेथे वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांच्या उपचारासाठी खासदार डॉ. गावित यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे कोच उपचाराकरिता उपलब्ध व्हावी, असा पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. ११ रोजी नंदुरबार येथील रेल्वेस्थानकाच्या प्लॅर्टफार्म क्रमांक तीन याठिकाणी रेल्वेची कोविड कोच उपलब्ध होणार आहे. या कोविड रेल्वेमध्ये २० डबे असणार असून, एका कोचमध्ये १६ ते २४ बेड असतील. मच्छरदाणीसह बाथरूम व दोन बायोटॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच एका कोचमध्ये दोन ऑक्सिजन व कूलरची व्यवस्था असणार आहे. कोचमध्ये तीनशे ते चारशे रुग्ण कमी लक्षणेसदृश असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येईल.

या रेल्वे कोचमध्ये नंदुरबार जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येतील, तसेच या कोचच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. १२ एप्रिलपासून रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार गावित यांनी दिली.