शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ातील भराडीपादर-खाई रस्त्यावर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील भराडीपादर ते खाई रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील भराडीपादर ते खाई रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. दरम्यान, यामुळे या भागातील संपर्क तुटला आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना या भागात घडत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील गोरजाबारीमार्गे भराडीपादर ते खाई या रस्त्यावर वेळोवेळी दरड कोसळत आहे. रस्ता मोकळा केला जात असतानाच पुन्हा पुन्हा दरड कोसळ्यामुळे रस्ता बंद पडला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या रस्त्यावरून आता केवळ त्यावरुन केवळ दुचाकीच निघू शकते, अशा परिस्थितीमुळे हा रस्ता वाहतुकीला धोक्याचा ठरत आहे. मोठय़ा वाहनधारकांना फेरा मारून कुवा व भराडीपादर या मार्गाने भराडीपादर, रायसिंगपूरमार्गे खापर, अक्कलकुवार्पयत पोहोचावे लागत आहे. सततच्या पावसामुळे घाट  सेक्शन च्या भाग असलेल्या   रस्त्यावर डोंगरावरून दरड कोसळण्याचे सुरूच असुन अक्कलकुवा तालुक्यातील भराडीपादर गोरजाबारी खाई या रस्त्यावर चार पाच   ठिकाणी दरड व मातीच्या मलबा कोसळून पडल्याने रस्ता पूर्ण बंद  पडला आहे. त्यामुळे खाई, गोरजाबारी, ओहवा, सरपंचपाडा खाई या गाव पाड्यांवरील वाहनधारकांना फेरा मारून कुवा भराडीपादर या मार्गाने  परत भराडीपादर रायसिगपुर करत खापर, अक्कलकुवा गाठावे लागत असुन त्यामुळे वाहनधारकांना त्रासदायक झाले आहे. या रस्त्यावर पडणारे दरड व मातीच्या मलबा वेळेवर काढला जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.