शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल युनिट गैरव्यवहाप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

नवापूर तालुक्यातील वावडी, तळोदा तालुक्यातील बोरद व धडगाव तालुक्यातील धनाजे या ठिकाणी २०१६-१७ या वर्षात तयार करण्यात आलेल्या मोबाइल ...

नवापूर तालुक्यातील वावडी, तळोदा तालुक्यातील बोरद व धडगाव तालुक्यातील धनाजे या ठिकाणी २०१६-१७ या वर्षात तयार करण्यात आलेल्या मोबाइल मेडिकल युनिटमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे मिळाल्या होत्या. याप्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सोमवंशी यांनी चाैकशी समिती गठित करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चाैकशा केल्या होत्या. चाैकशीतून मोबाइल युनिटसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे लॉगबुक बनावट असल्याचे, तसेच औषधी खरेदी, वाहन दुरुस्ती यासह विविध वस्तूंची खरेदीही बोगसपणे करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा देऊन चाैकशीही झाली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून थंड बस्त्यात असलेल्या या प्रकरणाचा निकाल लावण्याची तयारी सुरू झाली असून, जिल्हा आरोग्य विभागाने तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालक यांच्याकडे दिला आहे. पुढे आरोग्य मंत्रालयात याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहणार आहे. मोबाइल युनिटमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका चाैकशी समितीने ठेवला होता; परंतु गेल्या चार वर्षांत मात्र सातत्याने कारवाई रखडत असल्याची माहिती समोर आली आहे.