शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

पाटचारींचा प्रस्ताव सिंचन विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी विकासासाठी पालिकेने सुमारे 17 कोटींचा आराखडाही     तयार केला असल्याची माहिती   जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी दिली.गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहादा शहर पूर्णत: जलमय झाले होते. शहरातील अनेक भाग पाण्याखाली होता. त्यामुळे जनजीवनही ठप्प झाले होते. सध्या पाणी कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अभिजित पाटील यांनी सांगितले की, शहरातून गेलेल्या  पाटचारी हा शहरासाठी गंभीर प्रश्न झाला आहे. जलसंपदा विभागाच्या पाटचा:या शहराच्या मध्यवर्ती भागातून जातात. या दोन पाटचा:या असून त्या नागरी वस्तीतून अनुक्रमे 2.2 किलोमीटर व दुसरी पाटचारी 3.91 किलोमीटर लांबीची आहे. या पाटचा:या ब्रिटिशकालीन आहेत. पाटचा:यांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. पाटचा:यांमध्ये प्लास्टीकच्या बाटल्या, गाळ, पालापाचोळा साचला असल्याने  त्यात प्रचंड घाण आहे. गेल्यावर्षी पालिकेने स्वखर्चातून नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन त्याची साफसफाई केली होती. काहींनी पाटचारींवर अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात या चा:यांमध्ये पाणी येत असल्याने गेल्या काही वर्षापासून शहराला पाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या पाटचा:यांचा शहरी हद्दीतील भाग जलसंपदा विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच सभेत हा ठराव केला होता व तो जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. गेल्या दोन वर्षापासून आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करीत आहोत. जळगाव कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंत्रालयात असून यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशीही बोलणे झाले आहे. लवकरच हा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने या जागेवर सुशोभिकरण व विकासाची कामे करण्यासाठी सुमारे 17 कोटींचा आराखडाही तयार केला आहे. त्यामुळे पाटचारी जलसंपदा विभागाने पालिकेकडे त्वरित हस्तांतरीत करण्याची आवश्यकता असून त्यासंदर्भात लवकरच आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. शहादा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून उपाययोजनाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.