शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

50 टंचाईग्रस्त गावांकडून विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:08 IST

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ...

नंदुरबार : तालुक्यात साडेतीन मीटर भूजल पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई कृती आराखडय़ांतर्गत 32 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होत़े यात तीन ठिकाणी विहिर अधिग्रहण करुन देण्यात प्रशासनाला यश आले असले तरी याव्यतिरिक्त 50 गावांकडून विहिर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दिले गेल्याने तालुक्यातील पाणीटंचाई भीषण झाल्याचे स्पष्ट झाले आह़े पाणीटंचाई कृती आराखडय़ानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 35 गावांचा समावेश करण्यात आला आह़े यातील 34 गावे ही एकटय़ा नंदुरबार तालुक्यातील आहेत़ तर केवळ एक गाव शहादा तालुक्यातील आहेत़ पाणीटंचाई भेडसावणा:या या गावांमध्ये खाजगी विहिरींचे अधिग्रहण आणि तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 6 कोटी 92 लाख 34 हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आह़े या खर्चाला मंजूरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवणे सुरु आह़े यात आतार्पयत तीन गावांच्या विहिरींचे अधिग्रहण पूर्ण करण्यात आले असले, तरी पंचायत समितीकडे विहिर अधिग्रहणासाठी 50 ग्रामपंचायतींनी स्वतंत्र प्रस्ताव दिले आहेत़ यातून मंजूर केलेला खर्च आणि वाढलेली गावांची संख्या यांचा ताळमेळ बसणार नसल्याने प्रशासनाला नवीन खर्च मंजूरी द्यावी लागण्याची चिन्हे आहेत़ स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पंचायत समितीकडे दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येऊन तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सोपवून अधिग्रहण करण्यात येत आह़े यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले असल्याचे म्हटले आह़े परंतू गेल्या आठ दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ांमुळे शासकीय कामकाज ठप्प होत़े सोमवारपासून कामकाज सुरु झाल्याने येत्या आठवडय़ात टंचाईनिवारणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, कोळदे, लहान शहादे, शिंदे, निंभेल, कं्रढे, घोटाणे, सातुर्के, भालेर, ओसर्ली, कानळदा, न्याहली, भादवड, बलदाणे, कार्ली, बलवंड, पळाशी, इंद्रीहट्ट, उमर्दे बुद्रुक, तिलाली, सैताणे, तलवाडे, खर्दे खुर्द, दहिंदुले खुर्द, शिंदगव्हाण, चौपाळे, तिसी, बामडोद, उमर्दे बुद्रुक, वडवद, मांजरे, होळ तर्फे रनाळे या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात विहिर अधिग्रहण करण्यासाठी खर्चास मंजूरी देण्यात आली आह़े यातील रनाळे, तलवाडे बुद्रुक आणि घोटाणे या गावांनी प्रस्ताव दिल्यानंतर तात्काळ विहिरींचे अधिग्रहण करुन टंचाई दूर करण्यास प्रशासनाला यश आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू उर्वरित 31 गावामध्ये अद्यापही अधिग्रहण आणि पाईपलाईनच्या कामांना गती मिळालेली नाही़