लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ओलाव्याचे कारण देत बाजारपेठेत कापसाची खरेदी बंद आह़े या बंदीचा लाभ खाजगी व्यापारी उचलत असून शेतक:याच्या ओल्या कापसाला 2 हजार रुपये प्रतीक्विंटल असा मातीतोल दर देण्याचा प्रकार सुरु आह़े यानंतरही सीसीआय आणि बाजार समितीने 13 तारखेपासून कापूस खरेदी सुरु करण्याचे शेतक:यांना कळवले आह़े जिल्ह्यात यंदा अतीवृष्टी आणि अवकाळी या नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े यातून सावरण्यासाठी शेतकरी बाहेरगावाहून मजूर आणून कापूस वेचणी करुन तो घरी आणत आहेत़ ओला असलेला कापूस सुकेल अशी अपेक्षा असताना अवकाळी पाऊस वेळावेळी कोसळून ढगाळ वातावरण निर्माण होत आह़े यातून कापसातील ओलावा हा 50 ते 60 टक्के असल्याने व्यापारी कापसाला हातच लावत नसल्याचे चित्र आह़े याचा फायदा उचलत खाजगी पद्धतीने खेडा खरेदी करणारे व्यापारी उचलत असून त्यांच्याकडून कापसाला प्रतीक्विंटल 2 हजार रुपयांपासून पुढे दर देण्यास सुरुवात झाली आह़े नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर गेल्या आठ दिवसात असंख्य शेतक:यांनी कापूस विक्री करण्याबाबत विचारणा केली होती़ याठिकाणी बाजार समितीने तिघा व्यापा:यांना परवाना दिला आह़े त्यांच्याकडूनही ओलाव्याचे कारण देत कापसाला अत्यंत पडेल दर दिल्याची माहिती समोर येत आह़े एकीकडे परवानाधारक व्यापा:यांची स्थिती गंभीर असताना दुसरीकडे सीसीआयचे केंद्रही बंद आह़े हे केंद्र येत्या 13 नोव्हेंबरला सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी सीसीआयने अद्याप हमीभाव किंवा व्यावसायिक दरांनी खरेदी करणार हे जाहिर केलेले नाही़ यातून शेतकरी संभ्रमात आहेत़ तब्बल 10 दिवसानंतर बाजार सुरु होणार असल्याने दरम्यानच्या काळात अवकाळी झाल्यास कापसाचे नुकसान झाल्यास शेतक:यांच्या हातून यंदाचा हंगाम जाण्याची भिती आह़े या भितीतून शेतकरी खेडा खरेदी करणा:यांना मिळेल त्या भावात कापूस देऊन आर्थिक गणित बसवण्याचा प्रयत्न करत आहेत़
नंदुरबार आणि शहादा अशा दोन ठिकाणी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयची दोन खरेदी केंद्रे आहेत़ ही केंद्रे ऑक्टोबर महिन्यात सुरु होणे रास्त होत़े परंतू प्रत्यक्षात अद्यापही केंद्र बंद आहेत़ सोमवारी सीसीआयच्या अधिका:यांनी नंदुरबार आणि शहादा येथील केंद्रांचा दौरा केला आह़े त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी सीसीआयचा हमीभाव जाहिर केलेला नाही़ शेतक:यांना दोन दिवसांपासून उन्हाने साथ दिल्याने कापूस वेचणी सुरु झाली असली तरी रात्रीच्यावेळी रिमङिाम पाऊस आणि ओस यामुळे कापसातील ओलावा कायम राहत आह़े यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी वेचणीसाठी तयारी करीत असले तरी मजूरांची टंचाई त्यांना ब्रेक लावत आह़े बाजार समितीच्या खरेदी केंद्रात जनिंग मालकांकडून खरेदी होणा:या कापसातील सरकीला अधिक मोल असल्याने ओल्या कापसाला ते सातत्याने नाकारत आहेत़ यातून चारचाकी वाहनात आणलेला माल परत न्यावा लागत असल्याने त्यापोटी देण्यात येणा:या भाडय़ासाठीही पैसे खर्च करावे लागत असल्याने त्यासाठी कर्ज करण्याची वेळ येत आह़े
दरम्यान कापसाबाबत नैराश्य असताना सोयाबीनच्या दरांमुळे शेतक:यांना आधार मिळाला आह़े नंदुरबार बाजार समितीत सोयाबीन 3 हजार 500 ते 4 हजार तर शहादा बाजारात सोयाबीन चार हजार रुपये प्रतीक्विंटल दरांनी सोयाबीनची खरेदी सुरु झाली आह़े