शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील पोलीसाला कैद्यांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा कारागृहात न्यायबंदी असलेल्या दोघांनी थेट कारागृह पोलीसाला मारहाण केल्याची घटना पाच जानेवारी रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा कारागृहात न्यायबंदी असलेल्या दोघांनी थेट कारागृह पोलीसाला मारहाण केल्याची घटना पाच जानेवारी रोजी घडली होती़ तब्बल पाच दिवस उलटल्यानंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कारागृहात कर्तव्य बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र सोमा रोकडे यांनी न्यायबंदी असलेल्या प्रविण आधार कोळी व गोकूळ शंकर चव्हाण या दोघांना बॅरेक क्रमांक पाच मध्ये जाण्याची सूचना केली होती़ याचा राग येऊन प्रविण कोळी आणि गोकूळ चव्हाण या दोघांनी रामचंद्र रोकडे यांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ दरम्यान प्रविण कोळी यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोकडे यांना मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ याप्रकारानंतर कारागृहातील कर्मचारी पुढे आल्यानंतर दोघे बॅरेकमध्ये गेले होते़ पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर रामचंद्र रोकडे यांनी तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे यांच्याकडे अर्ज दिला होता़ त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र रोकडे यांच्या फिर्यादीवरुन प्रविण कोळी व गोकूळ चव्हाण या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक जी़टी़पवार करत आहेत़याबाबत तुरुंग अधिक्षक प्रदीप रणदिवे यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी संपर्क केला असता, ते कारागृहात नसल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पथक शनिवारी कारागृहात जाऊन चौकशी करणार आहे़ यानंतर दोघांना अटक होणार किंवा कसे यावरही शनिवारीच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दोघा बंदीवानांनी वाद घातल्यानंतर मारहाणीचा प्रकार घडत असताना तुरुंग अधिक्षक प्रदीप रणदिवे हे याच ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे़ परंतू त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अटकाव करण्यात आला नव्हता़ कारागृहातील दोघा बंदीवानांनी यापूर्वीही कारागृहात तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून कारागृह अधिक्षक यांच्याकडून त्यावेळी कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे़ कारागृह अधिकाऱ्यांना कॉन्स्टेबल रोकडे यांनी अर्ज दिल्यानंतर त्यावर तब्बल पाच दिवसांनी कारवाई करण्यात आल्याने पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़