शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान उज्वला योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: March 7, 2017 23:26 IST

अक्कलकुवा : तालुक्यात आज खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले़

अक्कलकुवा : तालुक्यात आज खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले़ या               वेळी पंतप्रधान उज्वला योजनेचा शुभारंभ ब्राम्हणगाव येथून करण्यात आला़या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, सरचिटणीस डॉक़ांतीलाल टाटीया, मांगीलाल जैन, जयमल पाडवी,   अजय पटेल, पंचायत समिती            सदस्या कविता कामे, मनोज डागा,  प्रा़ दिनेश खरात, सुरेशचंद जैन, योगेश सोनार, जि़प़ सदस्य           किरेसिंग वसावे, तालुकाध्यक्ष घनश्याम पाडवी, कपिल चौधरी जयेश चौधरी, संगिता कुमावत,चंपाबाई वळवी, योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते़ अक्कलकुवा तालुक्यात ११           रस्त्यांच्या कामांची उद्घाटने           तसेच देशातील उज्वला योजनेचा शुभारंभ ब्राम्हणगाव येथे करण्यात आला़ या वेळी डॉ़ गावीत म्हणाल्या की लवकरच गावात पंतप्रधान   आवास योजनेची कामे सुरु करण्यात येणार आहेत़ तसेच ज्यांची                  गॅस योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले़आदिवासी महिलांचे आरोग्य चांगले रहावे व त्यांचे कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण विविध योजना राबविणार असल्याचेही खा़ डॉ़ गावीत            यांनी सांगितले़ दरम्यान, कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग            वसावे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस                 डॉ़ कांतीलाल टाटीया, नागेश            पाडवी आदींनीदेखील विविध विषयांवर मार्गदर्शन केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंडियन गॅसचे संचालक देविलाल भंसाली, राहुल चव्हाण, संदिप भंसाली            आदींनी परिश्रम घेतले़ या वेळी देशातील पहिली लाभार्थी हावडूबाई वसावे, ब्राम्हणगावचे सरपंच जितेंद्र वसावे, उपसरपंच अनवर वसावे, अजबसिंग महाराज, सिंधूबाई वसावे, जगदिश चित्रकथी आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललीत जाट यांनी तर आभार प्रा़ दिनेश खरात यांनी मानले़दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)योजनेसाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा- खा़डॉ़ गावीतआमदार डॉ़ विजयकुमार गावीत आदिवासी विकासमंत्री असताना आदिवासींना गॅस कनेक्शन ही योजना सुरु करण्यात आली होती़ मात्र त्यावेळी विरोधकांनी ही योजना बंद करण्यासाठी तक्रारी करण्यास सुरुवात करुन योजना बंद पाडली़ परंतु सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे़ आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा करुन पंतप्रधान उज्वला योजना  सुरु केली असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला़ आदिवासी दुर्गम भागातील ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही या वेळी खासदार डॉ़ हिना गावीत यांनी सागितले़