शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पपई दराचा तिढा सुटला ७ रुपये ११ पैसे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:14 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्या सूचनेनुसार पपई दराचा तिढा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्या सूचनेनुसार पपई दराचा तिढा सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, पपई उत्पादक शेतकरी समन्वय समिती व शेतकरी यांच्यात तब्बल चार तास प्रदीर्घ चर्चा होऊन अखेर सात रुपये ११ पैसे पपईचा दर ठरविण्यात आला.उत्तर भारतात पपईचे दर चांगले असूनही येथील पपई खरेदीदार व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांकडून पपई खरेदी करीत होते. त्यासाठी पपई उत्पादक संघर्ष समितीने प्रशासनाने मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी व पपई उत्पादक समन्वय समिती, व्यापारी, शेतकरी यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी समन्वयाने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली. त्यात तीन दिवसात उत्तर भारतातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास  शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही नुकसान होईल या हेतूने तातडीने बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. सुमारे चार तास दरासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी समन्वयातून सात रुपये ११ पैसे दर निश्चित केला. पुढील बैठक होईपर्यंत या दराने पपईची तोडणी करावी, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील,  विश्वनाथ पाटील, दीपक पाटील, डॉ. उमेश पाटील, प्रफुल पाटील, राकेश गिरासे, दिनेश पाटील, संदीप माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते. तर व्यापारी प्रतिनिधी म्हणून नाजिम बागवान, फारुक बागवान, हाशिम मुल्लाजी, इक्बाल बागवान ,शहबाज पठाण, प्रकाशराजस्थानी, जोगाराम राजस्थानी, छोटेराम राजस्थानी आदींसह व्यापारी उपस्थित होते.