शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप दोन दिवस मुसळधारचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जुलैचा शेवटचा व ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवडय़ात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला होता. एक हजारापेक्षा अधीक घरांची पडझड झाली होती तर  सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जेमतेम गेल्या आठवडय़ात रस्त्याची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यातच पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे   प्रशासनाने पुन्हा सतर्कता बाळगली आहे. दिवसभर पावसाची रिपरिपसोमवारी पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नंदुरबार, तळोदा व शहादा तालुक्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे जनजिवनावर त्याचा परिणाम दिसून आला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.शेती कामांना पुन्हा ब्रेकसतत तीन आठवडे पावसाची संततधार राहिल्यामुळे शेती कामांना ब्रेक मिळाला होता. परिणामी शेतांमध्ये तण वाढले होते. निंदणी व कोळपणीसारखी कामे करता आली नव्हती. वेळेवर खतांचा व किटकनाशकांचा मात्रा देखील देता आला नव्हता. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेवून ब:यापैकी ऊन देखील पडले होते. त्यामुळे शेतक:यांनी जास्तीत जास्त आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला होता. परिणामी शेती कामांना मजूर देखील मिळत नव्हते. अशातच पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे.प्रशासन सतर्कजिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व अधिकारी व कर्मचा:यांना मुख्यालयी थांबण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. नदी काठच्या     गावांना दवंडीद्वारे माहिती देण्यात येत आहे. 

हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे एक लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे एक लाख 28 हजार क्युसेक्स, तर प्रकाशा बॅरेजचे आठ गेट पुर्ण उघडण्यात येऊन एक लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.