शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामीण विकासात महत्त्वाचे स्थान असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा प्रचार ऐन भरात आहे.  राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामीण विकासात महत्त्वाचे स्थान असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा प्रचार ऐन भरात आहे.  राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे तीन राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येवून निवडणूका लढवतील अशी अपेक्षा होती. परंतू ग्रामपंचायत निवडणूकीत गाव पातळीवरील नेत्यांचे अस्तित्त्व महत्त्वाचे असल्याने पक्षीय पातळीवरुन त्यांच्यावर कोणतीही बंधने नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यातून ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढत आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम सुरु असताना  पक्षाचा आदेश मानत  निष्ठेने काम करणारे पुढारी व कार्यकर्ते निवडणूक प्रचारात पक्षाच्या चिन्हाचा किंवा पदाचा वापर न करता गावातील मुद्द्यांवर चर्चा करत असल्याने या निवडणूका राजकीय पक्षविरहित ठरत आहेत. असे असले तरी येत्या काळात ग्रामपंचायतीत बहुमत सिद्ध करुन सरपंच पद मिळवण्यासाठी राज्यात सत्तेत असलेले किंवा विरोधात असलेल्या हातमिळवणी करण्याची वेळ आल्यास तसेही शक्य करुन दाखवण्याचा निश्चय पुढारी व कार्यकर्त्यांचा आहे. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पदाधिकारी ज्या पक्षाचा असेल त्याच्या पॅनललाही त्याच पक्षाचा म्हणून ओळख मिळत आहे. केवळ एवढ्याचा एका बाबीतून ही निवडणूक राजकीय पक्षांसोबत निगडीत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नंदुरबार तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच बाेलबाला आहे. तीन ठिकाणच्या बिनविरोध ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तोडगा काढून सरपंचपदावर हक्क सांगितला आहे. 

निवडणूकीत एकमेकांचे उणेदुणे काढणे टाळण्यावरच अधिक भर दरम्यान सध्या निवडणूक प्रचार सुरु असताना गावात गेल्या पाच वर्षातील विकास आणि येत्या पाच वर्षातील विकास यावरच बोलण्याची तसदी उमेदवार घेत आहेत.    केवळ गावातील मुद्दयांवर चर्चा होत असल्याने येत्या काळात ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मदत लागल्यास वाद हाेवू नये, म्हणून वादाचे मुद्दे टाळले जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

दरम्यान याबाबत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांना संपर्क केला असता, प्रकृती बरी नसल्याने आरामक करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान ग्रामपंचायत निवडणूकांचा येत्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दुसरीकडे काँग्रेसचे इतर पदाधिकारीही निकालानंतरच्या आघाडीसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे. 

निकालानंतर चित्र बदलेलनंदुरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. १५ रोजी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर निवडून येणा-या जागांनुसार सरपंच पदावर दावे-प्रतिदावे होणार आहेत. यात मित्रपक्षांची गरज भासण्याची शक्यता आहे. पॅनलला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडून आलेल्या दुस-या पॅनलच्या उमेदवाराला सोबत घेता यावे यासाठीही आतापासून फिल्डिंग लावली जात आहे. 

गावपातळीवरील नेत्यांचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. ते गावाचं राजकारण करत असल्याने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये यापूर्वी झालेले वाद व भानगडींमुळे अनेकांचे संबध खराब झाले आहेत. यामुळे या निवडणूका पक्षविरहीत व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. निकालानंतर बदल शक्य आहेत.         - डाॅ. विक्रांत मोरेजिल्हाध्यक्ष, शिवसेना

ग्रामीण निवडणूका हा राजकारणा पाया आहे. तेथील स्थानिक नेत्यांची मते व विचारांना महत्त्व आहे.स्थानिक पातळीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयांना पक्षीय पातळीवर स्थान आहे. यातून आघाडीसारखे निर्णय झालेले नाहीत. निकालानंतर मात्र चित्र बदलू शकते.       - डाॅ. अभिजीत मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी