तुरीला मिळतोय सहा हजार २०० रुपये भाव
नंदुरबार : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक साधारण आहे. अवकाळी पावसामुळे तूर उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे ३९ ते ५६ क्विंटल तूर मार्केटमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे तुरीला पाच हजार ८०० ते सहा हजार २०० रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
भरधाव वाहनांवर कारवाईची गरज
नंदुरबार : शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालवणाऱ्या वाहधारकांमुळे महिला व लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने रस्त्यावरून जाताना असुरक्षितता वाटत आहे. वाहतूक पोलिसांनी वेगवान वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करून वाहतुकीची शिस्त लावावी, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.