शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लहान शहादा येथे पोलिस निरिक्षकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावातील वस्तीत अडविलेला रस्ता मोकळा केल्याच्या वादातून लहान शहादा येथे झालेल्या मारहाणीतील संशयीतांना ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावातील वस्तीत अडविलेला रस्ता मोकळा केल्याच्या वादातून लहान शहादा येथे झालेल्या मारहाणीतील संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या जमावाने सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी जमावाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने, जमावबंदीचे उल्लंघन यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे.  अटक करण्यात आलेल्यांमध्ये हाडू जाण्या भिल, गणेश मालसिंग भिल, परसू मोतिराम भिल, वसंत लक्ष्मण भिल, मनेश हाडू भिल, अजरून धान्या भिल, अजय विजय भिल, सुकलाल उद्धव भिल, आत्माराम आनंद भिल, उत:या उद्धव भिल, फुलसिंग जाण्या भिल, पिंटू विजय ठाकरे, अंबालाल ताराचंद भिल यांचा त्यात समावेश आहे. पोलीस सूत्रांनुसार, लहान शहादा येथे बामळोद रस्त्यावरील वस्तीकडे जाणारा रस्ता काटे व दगड लावून बंद करण्यात आला होता. काही तरुणांनी तो रस्ता मोकळा करण्यासाठी काटे व दगड हटविले. त्याबाबत वस्तीतील लोकांनी विचारणा केल्यावर दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. याबाबत तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस निरिक्षक अविनाश निवृत्ती केदार यांनी पथकासह धाव घेतली. जमावाला पांगवत असतांना काही युवकांनी व महिलांनी सहायक निरिक्षक केदार व पोलीस पाटील मुकेश राजाराम पाटील यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. लागलीच अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आला. यावेळी जमावातील काहींनी पोलिसांनीच मारहाण केल्याचा बनाव रचून आपले कपडे फाडले.याबाबत सहायक निरिक्षक अविनाश केदार यांनी फिर्याद दिल्याने  जमावातील हाडू जाण्या भिल, राहुल वळवी, गणेश भिल, निलेश भिल, उषाबाई भिल, गणेश भिल, गणेश संतू भिल, गणेश माल्या भिल, अनिल भिल, योगेश भिल, शेगा भिल, पिंटय़ा भिल, विजय भिल, लालू भिल, सूरज भिल, परसू भिल, दिनेश भिल, राकेश भिल, सुनील भिल, वसंत भिल, रमिला भिल, भागाबाई भिल, मनेश भिल, रवीन भिल, सुपडय़ा भिल व इतर 90 ते 100 जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. गावात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.