शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पाकीट उचलणा-याचा पोलीसाने केला पाठलाग, चालकाचे पैसे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 13:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  भाचीचा विवाहासाठी कुटुंबासह गावी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एकाचे रस्त्यात पडलेले पाकीट दिसून आले. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  भाचीचा विवाहासाठी कुटुंबासह गावी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एकाचे रस्त्यात पडलेले पाकीट दिसून आले. या पाकिटाजवळ पोहोचणार तेवढ्यात दुसऱ्याने ते उचलून घेत पळ काढला. पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा थेट १५ किलोमीटर पाठलाग करत त्याच्याकडून पाकीट घेत ते मूळ मालकाला परत केल्याची घटना नंदुरबारात घडली.२४ जानेवारी रोजीच्या या घटनेनंतर संबंधित चालकाला बोलावून त्याचे पाकीट सोमवारी परत देण्यात आले. याबाबत अधिक असे की, उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संजय प्रतापसिंग वळवी हे २४ रोजी सकाळी भाचीच्या विवाह सोहळ्यासाठी तळोद्याकडे जात होते. दरम्यान, राकसवाडा चाैफुलीवर काहीतरी खाली पडलेली प्लास्टिक वस्तू उचलून एकजण ती न्याहाळत असल्याचे दिसून आले. संजय वळवी यांनी त्यास आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, पिशवी उचलत संबधिताने दुचाकीने पळ काढला. पोलीस कर्मचारी वळवी यांच्यासोबत कुटुंब असतानाही त्यांनी दुचाकी संबंधिताचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, १५ किलोमीटरवर वाका चाररस्ता गावाजवळ पिशवी उचलणाऱ्यास त्यांनी थांबवत विचारणा केल्यावर घाबरून गेल्याचे त्याने सांगितले. कर्मचारी वळवी यांनी पिशवी तपासली असता त्यात वाघोदा येथे ट्रॅक्टरचालक असलेल्या सागर नाईक याचे ड्रायव्हिंग लायसन्स, इतर कागदपत्रे व १५ हजार रुपये आढळून आले. वळवी यांनी ते घेत भाचीच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली. सोमवारी परत आल्यानंतर सागर नाईक याचा शोध घेत त्याला पैशांचे पाकीट परत केले. हरवलेले पैसे परत मिळाल्याने सागर नाईक यालाही गहिवरून आले होते. वळवी यांच्या प्रामाणिकपणाचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.